वृत्तपत्र वार्ताहरांनी मिळविलेल्या रोचक कहाण्या प्रसिद्ध होत असतात. अशा कहाण्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
तितकेच महत्त्वाचे काम आकाशवाणी, दूरदर्शन, पीआयबी, माहिती खात्याचे अधिकारी, कर्मचारी अनेक वेळा करत असतात. परंतु त्याची दखल कोणी घेतलेली दिसत नाही. उलट ”सरकारी माध्यमाचे पत्रकार” म्हणून त्यांची उपेक्षा होते. अनेक महत्त्वाच्या घटनांचे वृत्तलेखन खाजगी माध्यमांच्या शी स्पर्धा करून आपल्या अशा सहकाऱ्यांनी केलेले असते.
जयप्रकाश नारायण यांच्या मृत्यूच्या बातमी बद्दल काय घडले ते आठवून पहा. त्या वेळच्या पंतप्रधानांनी चुकीची बातमी संसदेत जाहीर केली होती. आकाशवाणी चे त्यावेळचे बातमीदार चंद्रशेखर कारखानिस यांनी अचूक वार्तांकन करून देशातील सर्व वृत्तसंस्था आणि वृत्तपत्र यांना मागे टाकले होते.
आचार्य विनोबा भावे यांच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी यु एन आय ने दिली होती. आकाशवाणीचे तेव्हाचे नागपूर येथील वार्ताहर कर्नल तांबेकर यांनी केलेले वार्तांकन नावाजले गेले होते होते. पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस अशा मातब्बर संस्थांचे बातमीदार यावेळी मागे पडले होते.
असे अनेक प्रसंग सांगता येतील.
अनेक शासकीय माध्यमांचे पत्रकार यांचे असे दाखले कितीतरी देता येतील.अशा घटनांचे दस्त ऐवजीकरण करणे हे आपलेच काम आहे असे मानणाऱ्या बंधू भगिनींना न्यूज स्टोरी टुडे आवाहन करीत आहे की, आपण केलेले असे महत्त्वाचे रोचक वार्तांकन सविस्तर लिहून न्यूज स्टोरी टुडे पाठवा. भाषा मराठी असावी. एका प्रसंगाची शब्द संख्या सुमारे 1000 असू द्या.
हे वार्तांकन साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध करायला आम्हाला आनंद वाटेल.
वर्ष अखेरीस अशा वार्तांकनाच्या कहाण्या पुस्तक स्वरूपात प्रकाशित करता येतील.
न्यूज स्टोरी टुडे ने आतापर्यंत पाच पुस्तके प्रकाशित केली आहेत.
तेव्हा वेळ गमवता या आपले लेखन,काही अनुषंगिक छायाचित्रे,आपला अल्प परिचय पुढील व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवावा. +919869484800
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक
www. newsstorytoday.com. ☎️ 9869484800