नमस्कार मंडळी …
आपल्या न्यूजस्टोरीटुडे या लोकप्रिय वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखांविषयी, कवितांविषयी भरभरून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या.
विशेषतः मेघना साने यांनी लिहिलेल्या “अमेरिकेत मराठी संस्कृती” या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया अभ्यासपूर्ण असून आपल्याला आत्म परिक्षण करायला लावणाऱ्या आहेत.
जागेअभावी अन्य प्रतिक्रिया घेता आल्या नाहीत या बद्दल क्षमस्व…
आपली स्नेहांकित
टीम एनएसटी
मेघना साने यांचा ‘अमेरिकेत मराठी संस्कृती ‘ लेख खूपच सुंदर .मराठीपण जपण्यासाठी मराठी लोकांनी घेतलेले परिश्रम खरेच वाखाणण्याजोगे.👍
पूर्णिमा शेंडे यांचे पितृ समान सासरे श्री विनायक शेंडे यांचे आध्यात्मिक आणि धार्मिक ज्ञान तसेच लेखिकेला शिकवण्याची आस्था पाहून खूप भारावून गेले.🙏🙏🙏
विलास कुडके यांचा ‘ आम्ही नासिककर ‘ लेख समस्त नाशिक शहराचे दर्शन घडवतो. पंचवटी, रामकुंड, तपोवन, गोदावरी उगम, त्र्यंबकेश्वर आदी पवित्र स्थानानी नटलेले नाशिक, नाशिकमधील प्रसिध्द मिसळ, कोंडाजी चिवडा, साबुदाणा वडा, जिलेबी तसेच द्राक्षे, मनुका इत्यादी खाद्यपदार्थ आणि नासिक आणि नाशिक यातील फरक वगैरेंचे वर्णन अतिशय सुंदर रित्या केलेले आहे. नासिककर असल्याचा लेखकाचा अभिमान अगदी सार्थ आहे ❤️❤️❤️

– मानसी लाड, चेंबूर, मुंबई.
– मास्क कधी जाणार याविषयीचं अलका भुजबळ यांचं लेखन खूपच छान.
सुरेखा गावंडे यांच्या लघुपटाचा विषय आवडला.
नगरची सायकल मस्त. आमच्या घरच्या सायकलची आठवण झाली.लहानपणी खूप चालवली.👌
विलास कुडके यांचा आम्ही नाशिककर लेख खूप छान.
नवी मुंबई प्रमाणे ऑक्सिजन बँक सगळीकडे झाली पाहिजे.
मेघना साने यांचा लेख आवडला.

🙏 ललिता देशमुख, ठाणे
– रश्मी हेडे यांची परिवर्तन बोधकथा अप्रतिम. अलका भुजबळ यांची मुलाखत प्रेरणादायी. सर्वच लिखाण व निवड उत्कृष्ट , वाचनीय असतं म्हणून जास्त मनाला भावतं.

– मृदुला चिटणीस, सानपाडा, नवी मुंबई.
– शुभदा रामधरणे यांचा लेख 👌🏼👌🏼अलका भुजबळ यांची मुलाखत लय भारी 👍🏻👍🏻👍🏻
अहिल्याबाई होळकर पूजनीय आहेतच🙏
म्यूकरमायकोसीस बद्दल खूप छान माहिती मिळाली 👍🏻
माणूस थांबला… कविता सुंदर 👌🏼
तंबाखू जनजागरण मोहीम 👍🏻👍🏻👍🏻
रश्मी हेडे यांची युवा पिढी बद्दल छान माहिती.👌🏼
जी पी खैरनार यांची मानव आणि कोरोना वरची कविता छान👌🏼 वर्षा भाबल यांचं आत्मकथन एक नंबर.वाचून गावी गेल्या सारखं वाटलं.गावाचं वर्णन अप्रतिम. बाकी सर्वच लेख छान.
सुरेखा गावंडे यांचा ऑक्सिजन लघुपट येतो आहे. त्यांचे अभिनंदन. माझं मन कविता छान👌
मास्कवरचा लेख मस्त☺️ बाकी सर्वच लेख सुंदर.
आपण उभयता एव्हढं छान दैनिक चालवता याबद्दल अभिनंदन.💐

– सुप्रिया सावंत, पनवेल.
– नमस्कार, “अमेरिकेतली मराठी संस्कृती” हा डॉ. मेघना साने यांचा लेख वाचला. खुप छान लेख आहे.
विश्व मराठी ऑनलाईन संम्मेल़नात या महाराष्ट्र मंडळांबद्दल ऐकले होते, मात्र तुमच्या या लेखाद्वारे महाराष्ट्र मंडळांची सुरुवात कशी आणि केव्हा झाली हे समजले. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपुर्ण जगात लक्ष वेधून घेते. अशी महाराष्ट्र मंडळे जगभरात मराठी भाषेला समृद्ध करत आहेत. मराठी भाषिक म्हणून या गोष्टीचा खुप अभिमान वाटतो. पण एक खंत आहे. विदेशातले मराठी वंशीय मुलं- मुली मायबोली शिकत आहेत आणि दुसरीकडे भारतात महाराष्ट्रा व्यतिरिक्त जिथे मराठी भाषिक राहतात त्यांची मुलं- मुली मात्र घरी त्यांच्या “मराठी पालकांशी हिंदीतून बोलतात”. मी नोयडामध्ये आहे आणि इथे माझा एका मराठी चौकोनी कुटुंबाशी परिचय झाला तेव्हा ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. CBSE, ICSE बोर्डांच्या भारतीय शाळा भारतीय भाषांबाबत उदासीन दिसतात. भाषेला फक्त संवादाचे माध्यम एवढ्याच मर्यादेत बांधले जाते असे जाणवते. केवळ मराठीच नव्हे तर प्रत्येक भारतीय भाषेबद्दल सर्वांगाने विचार करण्याची गरज आहे.
येत्या शैक्षणिक कालखंडात इंजिनीअरिंगचे शिक्षण मराठी, हिंदी, बांगला अशा काही प्रादेशिक भाषांमधून दिले जाणार आहे या निर्णयाचे मी स्वागत करते. मात्र इथे औपचारिक स्वरुपाची मराठी भाषा न वापरता सहज सोप्या मराठीत हे ज्ञान दिले जावे हीच अपेक्षा आहे.
विदेशात मराठी भाषेला जीवंत ठेवण्याचे कार्य बघून कौतुक करताना भारतातच भारतीय भाषांचे संवर्धन करण्याबाबत प्रयक्ष कार्य करणेही गरजेचे वाटते.
धन्यवाद 🙏

मोनाली पाटील. नोएडा, उत्तर प्रदेश
नमस्कार सर 🙏
मेघना साने यांनी लिहिला “अमेरिकेत मराठी संस्कृती” हा News Story Today मधील लेख वाचला. मराठी संस्कृती आपल्या मुलांना कळावी म्हणून स्नेहल वझे, वृंदा देवल यांनी पुढाकार घेऊन मॉर्गनविल मराठी शाळा स्थापन केली. या मागे आपल्या मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळावं, त्यांच्याशी आपल्या मातृभाषेतून संवाद साधता यावा ही आंतरिक तळमळ होती. कारण लहान वयात होणारे आजी आजोबांचे संस्कार हे पुढील आयुष्यात देखील उपयोगी पडतात. आपली मराठी संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर मातृभाषा येणं गरजेचं आहे. हीच गरज लक्षात घेऊन अमेरिकेतील काही मराठी बांधवांनी आपल्या मुलांना मातृभाषेची शिकवण देत आणि परिश्रम घेत अमेरिकेत मराठी शाळा सुरू केल्या. यथावकाश अभ्यासक्रम ही लागू झाला, परीक्षा होऊ लागल्या आणि आज या शाळांमधून नाट्य कला सादर करण्याएवढी ही सर्व मुलं मातृभाषेत पारंगत झाली आहेत याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो. मेघना साने यांनी लिहिलेल्या या लेखामुळे एका चांगल्या कार्याची नोंद घेतली गेली आणि मराठी भाषा आणि संस्कृती पुढच्या पिढीकडून सांभाळली जाईल याची खात्री पटली. सर, मेघना साने यांच्या प्रमाणेच तुम्हालाही खूप खूप धन्यवाद🙏

विकास मधुसूदन भावे, ठाणे, महाराष्ट्र
– नमस्कार. मेघनाताईंचा अमेरिकेतील मराठी संस्कृती… बाबतचा लेख वाचला. इथे राहून त्याचे विशेष असे काही वाटत नाही परंतु तिथे राहणाऱ्यांच्या भावना लेखातून समजल्या. तसे मराठी संस्कृती साठी कामं करणाऱ्यांचे योगदान समजले. खरोखर उत्तम कामं केले आहे. आवर्जून कळवावे असे वाटले.
आपला परिचय नाही. परंतु लेखाचे शेवटी आपला नंबर दिसला. म्हणून अभिप्राय आणि अभिनंदन करावेसे वाटले.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻

सौ अलका अग्निहोत्री. एक वाचक.
– आपण मनातील आपली खंत चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहे. सदर खंत ही सर्व साधारणतः सर्वांचीच आहे त्यामुळे “कधी एकदाचा मास्क जाईल बाई ” हा लेख आम्हाला खूप आवडला आहे…..

– विलास सरोदे, औरंगाबाद
– सायकल वरचे तिन्ही लेख माहितीपूर्ण आणि रंजक. रश्मी मॅडम यांची आठवणी कविता पण खूप छान👌🏼👍 खूपच छान विचार. अभिनंदन अभिनंदन अभिजीत बांगर साहेबांचे आणि ते आमच्या पर्यंत news story today माध्यमातून पोहोचवल्या बद्दल देवेन्द्र सरांचे 💐मी नासिककर भन्नाट. काय लिहिलंय, अप्रतिम. पूर्ण नाशिकमय वाटायला लागलं. खूप छान. विलास कुडके यांना खूप खूप शुभेच्छा. पूर्णिमा मॅडम यांनी सासऱ्यानबद्दल ब खूप छान शब्दबद केलं आहे. अमेरिकेतल्या मराठी माणसांची कामगिरी वाचून क्षणाक्षणाला उत्सुकता ताणत होती. खूप छान वाटलं वाचून. त्रिवार अभिनंदन आपल्या मराठी जनांचे 💐

– शुभदा रामधरणे. वाशी, नवी मुंबई.
– 🕉️🙏🚩🌹 नमस्कार. पूर्वी घरातून बाहेर कार्यालयात जाण्यापूर्वी सौ.म्हणायची, “अहो ! पेरुचा पापा (पेन- रुमाल- चावी+पास+पाकीट) घेतला आहे का ? आणि आता श्री व सौ. “अरे, मारुचा पापा घेतलास का ?(मास्क+रुमाल+चावी+पास+पाकीट) एकमेकांना विचारत आहेत… कालाय तस्मै नमः हेच खरं. शुभेच्छा. शुभ गुरुवासर🌹🚩🕉️🙏

– नंदकुमार रोपळेकर, जेष्ठ पत्रकार, मुंबई.
मा रश्मी हेडे यांचं लिखाण हे नेहमीच सामाजिक प्रश्नांशी निगडीत असत त्यांचे प्रगल्भ विचार त्यांच्या लिखाणातून जाणवतात त्यांच लिखाण खूप छान, सहज समजेल अशा साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे वाचकाला लगेच कळत त्यांचे लेख हे समाज प्रभोधन करणारे असतात त्यांच्या लिखाणामुळे त्या नक्कीच खूप मोठया लेखिका म्हणून नावारूपाला येतील