ओंकार सरस्वतीच्या वीणेचा
झंकार लक्ष्मीच्या पैंजणांचा.
सुस्वर कोकीळ घंटा नादाचा
दीनानाथांच्या अलौकिक कन्येचा.
गारूड घातले सूर सम्राज्ञीने
सूमधुर मधाळ अमृतवांणीने
हुंकार नादावले तना मनांचे
तल्लीन झाले गाभारे हृदयाचे
सुवर्णाक्षरांनी सोनेरी पान कोरले.
गान तपास्विनीचे नाव त्रिलोक्यात दुमदुमले.
श्वास मंदावले, ओढ लागली गांधर्व दुनियेची
ज्योत नंदादिपाची अनंतात विलीन झाली
नेत्र पाणावले, हुंदके दाटले,
शब्द अडखळले.
अद्वितीयास नतमस्तक झाले.
मोहोर आवाजाची उमटवून गेली
मंगेशकरांची लता अजरामर झाली.
— रचना : मीरा जोशी
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800