Thursday, December 25, 2025
Homeबातम्याबहुभाषिक सिंधुदुर्ग वेबसाईटचं उद्या लोकार्पण

बहुभाषिक सिंधुदुर्ग वेबसाईटचं उद्या लोकार्पण

जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटनाच्या दृष्टीने मार्केटिंग करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती असणारी, भारतातील सर्व आणि जगभरातील इतर अशा एकूण पन्नास भाषेमध्ये तयार केलेल्या  www.sindhudurg-parytan.com या वेबसाईटचं माजी केंद्रीय मंत्री, खासदार श्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते उद्या, ८ जून रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्ह द्वारे, लोकार्पण होत आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोडकर यांनी दिली. अशी वेबसाईट तयार करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्व भाषेत वेबसाईट असावी ही संकल्पना महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांची असून महासंघाचे सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोळकर यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले आहे.

सतीश पाटणकर

या वेबसाईट वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पर्यटन स्थळे, सागर किनारे, गावा गावातील मंदिरे, चर्च, गड-किल्ले, कृषी पर्यटन, लोककला, मालवणी पदार्थ, संस्कृती, जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास त्याच बरोबर आध्यात्मिक, साहसी ऍग्रो बीच टुरिझम याबरोबरच सिंधुदुर्गचा नकाशा आणि इतर सर्व पायाभूत सुविधांची माहिती मिळणार आहे.

महासंघाने आतापर्यंत राज्यातील आणि राज्याबाहेरील दहा ते बारा टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीशी संपर्क साधला आहे. राज्याबाहेरील असलेल्या या एजन्सींना त्यांच्या भाषेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती मिळाल्यास काही महिन्यानंतर पर्यटकांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे ओढा वाढेल असा विश्वास व्यक्त करून मोंडकर यांनी याद्वारे आधीच मेटाकुटीला आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टूर अँड ट्रॅव्हल्स तसेच छोटे उद्योजक आणि सर्व व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. 👍अभिनंदन, फारच छान उपक्रम. कोकणची माहिती सोशल मीडिया मध्ये प्रसारित झाल्यास पर्यटक संख्या वाढून स्थानिक लोकांचा रोजगार व उत्पन्न मध्ये वाढीस हातभार लागेल

  2. विशेष उल्लेखनीय व गौरवास्पद कार्य.

    हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा

  3. श्री सतीश पाटणकर यांचे कोकण पर्यटनाच्या क्षेत्रातील सर्व भाषेतील वेबसाईट निर्माण करण्याचे कार्य विशेष उल्लेखनीय व गौरवास्पद आहे. हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”