कुणी नाही कुणाचा वैरी
आपणच आपले वैरी
हा समाजात वागतो कसा
हा जीवन जगतो कसा
राग, लोभ, माया, मत्त्सर याचा आवरण हो याच्या मनाला
नाही सुचणार काय देणार हो या समाजाला
प्रेम आत्मयीता नाही हो याच्या जीवाला
सगळे दुर्जन दिसतात हो याच्या नजरेला
म्हणुनी दुःखाचे डोंगर हो याच्या नशिबाला
कुणी नाही कुणाचा वैरी……I
सारे आयुष्य घालविले रे भांडणात
अर्थ नाही उरला रे या जीवनात
मी मोठा मी मोठा मिरवतो या जगात
याला कसं काय कळत नाही आम्ही नांदू सर्व सारखे बंधू भावात
जीवनात येणार उतार चढावं म्हणून संगत चागंली धरावं
कर्म चांगले करावं नाही कुणावर जळाव
कुणी नाही कुणाचा वैरी…….II
आपलाच मन खातो आपल्याला
का दुःख देतो हा दुसऱ्याला
मोह, मायात लटकला फार
दुसरे दिसतात दुर्जन सारं
याचे नाही जुळणार मनाचं तार
याचा सोबत निर्बुध्दाचा गोतावला फार
याचा जीवनात नाही उरला रे मानवतेचा सार
कुणी नाही कुणाचा वैरी…….III
माणूस जन्म झाला कशाला
कळणार नाही या भामट्याला
पृथ्वीवर माजला हो क्रोधाचा बाजार
आप आपसात भांडतात हे शिलेदार
कोर्ट कचेरी लागली यांच्या कर्माला
बाप, लेक, बहीण, भाऊ ऊठले जीवाला
अहमतेमुळे किड लागली यांच्या नात्याला
कुणी नाही कुणाचा वैरी…..
याने केला पैशाचा बाजार
सर्व नातेगोते झाले बेजार
कर्मगती सोडत नाही कुणाला
हा विनोद सांगतो आपल्याला अर्पण का काही या समाजाला सार्थक ठरेल रे या जीवनाला
कुणी नाही कुणाचा वैरी…..

– रचना : विनोद प्रल्हाद भांडारकर.

जीवनाचं वास्तव शब्द रुपात मांडलंय
खूप सुंदर काव्य रचना आहे
अंतःकरणाला भिडणारे शब्द
आपल्याकडून आणखी अशाच सुंदर काव्य रचनांची अपेक्षा आहे
जळजळीत सत्य,वास्तवता…लिखाण व भाषाशैली छानच.. अंतकरणापासुंन निघालेले ओजस्वी शब्द…