तू ज्ञानदाती, तू बुद्धीदाती
तू कंठातील, स्वर वाग्वेत्ती।।
तू हंसवाहिनी, सकलमती दायिनी
शारदे तू ह्रदयात, तूच वीणा वादिनी।।
तूच ज्ञानमूर्ती, तूच अमुची आराधना
शब्द, गीत, साहित्य, प्रज्ञेची प्रेरणा।।
नमिते तुजला गे ठेविते पदी माथा।।
कृपाशिष लाभू दे यशकिर्ती गुण गाता।।
— रचना : अरूणा दुद्दलवार
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800