देश विदेशात शिवजयंती काल उत्साहात साजरी करण्यात आली. तशी ती नवी मुंबईतील सानपाडा येथील विवेकानंद संकुलात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संकुलातील इंग्रजी व मराठी माध्यमातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व निवडक विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्री विश्वास सोनवणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या महाराजांच्या सर्व किल्यांची माहिती व चित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन श्री सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रतिमा पूजन व छत्रपतींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वेशभूषा करून आलेल्या निवडक विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, ताराराणी, येसूबाई, शिवाजी महाराज यांच्या भूमिका साभिनय सादर केल्या. छत्रपतींचा पोवाडा व गीतांच्या सादरीकरणाने सारे वातावरण शिवमय तसेच स्वराज्य प्रेरणेने भारावून गेले होते.
श्री सोनवणे सरांनी यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच संकुल प्रमुख श्री विलास वाव्हळ यांनी शिवचरित्राचे काही प्रसंग तसेच मां साहेब जिजाऊ नी जसा शिवबा घडविला तसा आपल्या समोर वर्गात असलेले असंख्य शिवाजी घडविण्यासाठी उपस्थितांना जिजाऊ होण्याचे आवाहन केले. शेवटी सर्वांचे आभार मानून राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800