दरवर्षी ग्रंथोत्सव आयोजित करण्याचा शासनाचा उपक्रम अतिशय स्त्युत्य असून त्याचे महत्व लक्षात घेता आता हे ग्रंथोत्सव तालुका स्तरावर आयोजित करण्यात यावे, अशी अपेक्षा निवृत्त माहिती संचालक तथा न्युज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केली. वाशी येथील साहित्य मंदिरात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने दैनिक नवेशहर चे प्रतिनिधी श्री राजेंद्र घरत यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
ग्रंथोत्सव आता जरी ग्रंथालय संचालनालय आयोजित करीत असते, तरी सुरुवातीची काही वर्षे माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय ग्रंथोत्सव आयोजित करीत असे सांगून या ग्रंथोत्सवात साहित्य संवाद, मुलाखती, कवी संमेलन, गझल संमेलन, पुस्तक प्रदर्शन असे विविध प्रकारचे उपक्रम आयोजित होत असल्याने वाचक चळवळ वाढण्यास आणि समाजाची सांस्कृतिक जडण घडण होण्यात निश्चितच मोठे साहाय्य होते, असे सांगितले.
या मुलाखतीचा सारांश आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
— टीम एनएसटी. ☎️9869484800
खूप उपयुक्त सूचना.