चहा म्हणजे तरतरी
कॉफी म्हणजे निवांत बस तरी
चहा म्हणजे कामाचा ताण
कॉफी म्हणजे कोकिळेचे गाण
चहा म्हणजे उबदार
कॉफी म्हणजे रुबाबदार
चहा म्हणजे रतीब
कॉफी म्हणजे गुपित
चहा म्हणजे मस्त आलं, वेलदोडयाचा खमंग वास
कॉफी म्हणजे वेळ काढलेला तिच्यासाठी खास
चहा म्हणजे प्रसन्न सकाळ
कॉफी म्हणजे मदमस्त संध्याकाळ
चहा म्हणजे पक्षांचा चिवचिवाट
कॉफी म्हणजे तिचा मधुर आवाज
चहा म्हणजे अनेकांचा श्वास
कॉफी म्हणजे तिचा सहवास
चहा म्हणजे मनमोकळ्या गप्पा
कॉफी म्हणजे हृदयाचा कप्पा
चहा म्हणजे पावसाच्या सरी
कॉफी म्हणजे स्पेशल कोणतरी
चहा म्हणजे टपरिवरचे कटिंग
कॉफी म्हणजे प्रेमळ डेटिंग
चहा म्हणजे विरह
कॉफी म्हणजे प्रेमाचा संग्रह
चहा म्हणजे कधीतरी निवांत
कॉफी म्हणजे फक्त एकांत
चहा म्हणजे लग्नाची मागणी थेट
कॉफी म्हणजे ती पहिली भेट
चहा म्हणजे कडक
कॉफी म्हणजे तडप
चहा म्हणजे सर्वांची गर्दी
कॉफी म्हणजे फक्त ‘ती’ आणि ‘मी’.
कॉफी म्हणजे फक्त ‘ती’ आणि ‘मी’.

रचना : रश्मी हेडे.

👌
चहा ☕आणि कॉफी ☕ म्हणजे भारतीयांचे सर्वात आवडते पेय. उत्साह, तरतरी आणणारे पेय. पाहुण्यांचा पाहुणचार, स्वागत करावे तर याच पेयाने. मैत्रिणीं बरोबरच्या गप्पा तर या पेया शिवाय पूर्ण होत नाहीत. अश्या या सर्वांच्या लाडक्या पेयावर रश्मी तू खुप छान समर्पक कविता लिहिली आहेस. विशेष म्हणजे चहा केव्हा आणि कॉफी केव्हा घेतली जाती यातील फरकाचा जो मिश्किल बारकावा तू वर्णन केला आहेस तो खूप कौतुकास्पद आहे. तुझ्या सर्वच कविता आणि लेख दर्जेदारअसतात.आम्हाला वाचायला खूप आवडतात. आम्ही नेहमीच तुझ्या नवीन लिखाणाच्या प्रतीक्षेत असतो..😊😊
Waaaoo very nice 👍👍👌👌😊
Waaaoo very nice 👍👍👌👌😊
Waaao very nice 👍👍👌👌😊
व्वा.. दोन्हींचा दर्वळ मनात उमटला व आगळा तजेला अनुभवला.. मस्त
वा रश्मी एकदम तजेलदार ☕☕👌😍