शुभंकरोती साहित्य परिवार (संस्थापिका सौ. सोनाली जगताप) व नॅशनल लायब्ररी, वांद्रे (कार्यवाह प्रमोद महाडिक) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राज्यस्तरीय समर्थ नारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांनी भूषविले. तर उदघाटन सौ. हेमांगी नेरकर यांच्याहस्ते झाले.
यावेळी “तारक मेहता का उलटा चष्मा” फेम सोनालिका जोशी (कुलकर्णी – मिसेस भिडे ), त्यांच्या मातोश्री सौ. प्रतिभाताई कुलकर्णी या देखील उपस्थित होत्या.
सोनालिकाजींच्या हस्ते हिरकणी सौ. गीतांजली वाणी यांना साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी, शुभंकरोती राज्यस्तरीय समर्थ नारी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल सौ. गीतांजली वाणी यांना समाजातील विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800