कुठे राहिली माणसांची नाती
आज सारी सारी विखुरलेली
सुखावती, श्वापदांचे कळप
सदा सदा चालती संगसंगती…..
मानव आज सुशिक्षित झाला
सुखाची, व्याख्याच बदलली
आजकाल भौतिक प्रलोभने
जीवाजीवा, सुखावु लागली…..
दृष्टांत हा कलियुगाचा आता
भोवतो, अंतराला भोवताली
प्रेम, जिव्हाळा आता संपला
जाहली, काळजाची काहिली
सांगा कोणकुणाचे उरले आहे
प्रीतभावनांच सर्वत्र लोपलेली
— रचना : वि .ग. सातपुते
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जाहली काळजाची काहिली सुंदर कविता
गोविंद पाटील सर जळगाव