तुझ्या डोळ्यात जगायचे मला
स्वप्न म्हणून नाही, दृष्टी म्हणून
तुझा हातात हात पकडून ठेवायचा मला
एक आधार म्हणून नाही, एक ताकत म्हणून
तुझ्या पावलासोबत चालायचे मला
शोध म्हणून नाही, गवसलेला मार्ग म्हणून
तुझ्या मनात वास्तव्य करायचे मला
अनुभव म्हणून नाही, एक आठवण म्हणून
तुझ्या हृदयात जगायचे मला
रक्त म्हणून नाही, हृदयाचा ठोका म्हणून
तुझ्या शरीरात सामावून घे मला
आत्मा म्हणून नाही, एक अनुभूती म्हणून
तुझ्या जीवनात सामावून घे मला
व्यक्ती म्हणून नाही, जगण्याचे कारण म्हणून
— रचना : शिल्पा तगलपल्लेवार गंपावार. केमन आईलँड्स
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800