दोस्ता लगावली : गागाल,गालगागा x2
वृत्त : आनंदकंद
साधेच झाड मजला आहे पसंत दोस्ता
हे सर्व श्रेय त्याचे फुलतो वसंत दोस्ता ।
खाणीतल्या हिर्याला शोधून काढताना
सारेच श्रेय त्याचे नाहीच खंत दोस्ता ।
आता फिरावयाला रस्ता सुसाट आहे
सारे तुझेच आहे हे आसमंत दोस्ता ।
वाटेत झाड भेटे थांबू नकोस तेव्हा
चालायचे पुढेही, घडणे अनंत दोस्ता ।
वाकून रोज नमतो त्या माउली पुढे मी
तो हाच ज्ञानदेवा संतात संत दोस्ता ।
— रचना: प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर .
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800