खूप जाणीवपुर्वक
त्याचे लक्ष आहे,
तोच आहे कर्ता,
भावना, संवेदनांचा,
तोच जागवितो
जाणीव, मी पणाची,
तोच म्हणतो, माझे,
सार हाच याचा,
बघा तसे आयुष्य,
आपले न काही,
जन्मणे व मृत्यु,
तो ही, हातात नाही,
प्रवास तो मधला,
करावा लागतो,
तरी वृथा, माझे माझे,
का म्हणतो ?
अनेक कल्पना,
तो आकळत नाही,
सदा साक्षी आहे,
पण दिसत नाही,
आहे तो, ही जाणीव,
कधीकधी होते,
शोधले आर्ततेने,
शांती मग मिळते,
तोच राहूनी देहात,
चालवी संसार,
त्याचेच ध्यान व्हावे,
खरा हा विचार,
समाधान चित्ती,
ही त्याचीच कृपा,
तो सान्नीध्य आहे,
धीर हा अनोखा..!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800