हुंडाविरोधी चळवळीने संस्थेच्या ५१ व्या वर्धापनदिना निमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण अनुक्रमे श्री जयप्रकाश सावंत आणि श्री अनंत देशमुख यांनी केले.
या स्पर्धेत जळगावच्या वीणा बाविस्कर यांचा “भारतीय लोकशाहीचे संवर्धन कां व कसे ?” या विषयावरील निबंध सर्वोत्कृष्ठ ठरला असून त्यांना प्रथम पारितोषिक आणि जगन्नाथ परळकर ट्रॉफी जाहीर झाली आहे.
“भारताच्या संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे महत्व” या दुसऱ्या विषयावर लिहिलेल्या निबंधाला प्रथम पारितोषिक नवी मुंबईच्या शांती गुरव यांना जाहीर झाले आहे.
दोन्ही विषयातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत अनुक्रमे बकुल बोरकर- विलेपार्ले, मुंबई व भाग्यश्री पाटील–धुळे आणि वैशाली जोशी–विलेपार्ले, मुंबई व अनुजा नाळे-फलटण जिल्हा सातारा.
या व्यतिरिक्त दोन्ही विषयातील पाच निबंधांची निवड उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र प्राप्तीसाठी करण्यात आली. स्पर्धेचे यंदा ४५ वे वर्षं होते. पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एका विशेष कार्यक्रमात लोकमान्य सेवा संघ पारले, टिळक मंदिर, गोखले सभागृह, राम मंदिर मार्ग, विलेपार्ले (पूर्व) मुंबई येथे आयोजित केला असून विजेत्यांनी पारितोषिके स्वीकारण्यासाठी उपस्थित रहावे.
या प्रसंगी चळवळीतर्फे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. राधाबाई कुलकर्णी विधायक कार्यकर्ती पुरस्कार श्रीमती फरिदा लांबे- मुंबई, शकुंतला परळकर सेवाव्रती डॉक्टर पुरस्कार डॉ.शंतनू अभ्यंकर–वाई, जिल्हा सातारा यांना आणि सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री एकनाथ आव्हाड – चेंबूर मुंबई यांना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार श्री कुमार केतकर यांचे हस्ते प्रदान करण्यात येतील असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
सूचना : पारितोषिक प्राप्त नसलेला निबंध स्पर्धकांना परत हवा असल्यास रु.१५/- चे पोस्टेज लावलेले स्वतःचा संपूर्ण पत्ता (पिन कोड सहित) लिहीलेले पाकीट १५ जून २०२३ पर्यंत वरील पत्यावर पाठवावे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800