Sunday, December 22, 2024
Homeबातम्या'मेघमणी' : सुरांनी मंतरलेली संध्याकाळ

‘मेघमणी’ : सुरांनी मंतरलेली संध्याकाळ

ज्येष्ठ नागरिक संघ, मुलुंड यांनी आयोजित केलेला मेघना साने, हेमंत साने निर्मित ‘मेघमणी‘ हा कार्यक्रम नुकताच विरंगुळा केंद्र, मुलुंड येथे कमालीचा रंगला.

यावेळी संघाचे अध्यक्ष मुरलीधर शुक्ल, कार्यकारी अध्यक्ष सौ. श्रीकांती नगरकर आणि उपाध्यक्ष सौ. जयश्री विचारे या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेब पोर्टलच्या संपादिका सौ. अलका भुजबळ लाभल्या होत्या. अध्यक्षांनी त्यांचे स्वागत करताच अलकाताई यानी मेघना साने यांना स्वतः प्रकाशित केलेली ‘आम्ही अधिकारी झालो’ या देवेंद्र भुजबळ लिखित पुस्तकाची पहिली प्रत भेट दिली.

संत चरित्र, भक्ती गीते आणि ओव्या यांची सुरेल मैफल दीड दोन तास सुरू होती. मेघना साने यांनी संतांची चरित्रे छोट्या छोट्या गोष्टी रुपात सांगितली.
गौतम बुद्ध, संत ज्ञानदेव, कबीर यांपासून विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांचे कार्य सांगितल्यावर संतांचे अभंग आणि भक्ती गीते ही सादर होत होती.

गायिका श्रुती पटवर्धनने भक्तीगीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रुचिता कांबळी हीने गायलेल्या ‘तोरा मन दर्पण’ या गाण्याने श्रोते भारून गेले.

हेमंत साने यांनी खड्या आवाजात ‘चल गं सखे चल गं सखे’ पंढरीला असा सूर लावल्यावर त्यात ‘जय हरी विठ्ठल’ म्हणायला श्रोत्रवृंदही सामील झाला.

कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात मेघना साने रचित ओव्या गाण्यासाठी रुचिता कांबळी, नीलिमा सबनीस, सुप्रिया महाजन आणि नयन ठेकेदार सहभागी झाल्या होत्या.

हेमंत साने यांनी प्रत्येक ओवी वेगळ्या रागात बांधली होती आणि सुरेल स्वरात सगळ्या गायकांनी त्या गायल्या. प्रत्येक ओवीला प्रेक्षकांकडून टाळ्यांची दाद मिळत होती.

सदाचार आणि सर्वधर्मसमभाव याची शिकवण देणारा हा कार्यक्रम श्रोत्यांना मनापासून आवडला.

— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments