Friday, December 27, 2024
Homeसाहित्यक्रांतिकारी मशाल

क्रांतिकारी मशाल

रक्ताच्या एका-एका थेंबात होता आक्रोश
स्वातंत्र्याचा झरा वाहिला सळसळ
उच्च विचार, चातुर्य बुद्धी होती ज्यांची
भारताचे सुपुत्र विनायक क्रांतिकारी मशाल //१//

विदेशी वस्त्रांची जाळून केली होळी
हुकूमशाहीचा आत्मा गेला होरपळून
तिरंग्यात मधे धर्मचक्र भूषण
राष्ट्रवादाचा सुरुंग त्यांनी लावून //२//

साहसी, निडर, शक्तिमान ही व्यक्ती
अंदमानच्या काळ्या कोठडीत
वेदनांना जुगारुन, अस्वच्छतेत राहून
गोऱ्यांची केली फजिती,
भूख-मार सोसत //३//

ब्रिटिशांनी दिला आजीवन कारावास
शब्दात प्रशंसा मांडणे, अपुरे मज ज्ञान
असा क्रांतिवीर, सदा विश्वात अमर
जनतेच्या मुखी, स्वातंत्र्यवीर महान //४//

त्यांच्या काळ्या पाण्याची ती शिक्षा
साक्ष देते त्या घटनांची,
ज्ञान-ज्योत तरळे, त्यांच्या डोळ्यात
लेखन-काव्यांनी, भरली भिंत तुरुंगाची //५//

भ्याले नाहीत कधी मरणाला
शिष्टमंडळ कार्य पूर्णत्वास नेले त्यांनी
अन्न – पाण्याचा त्याग करून
स्वयं मृत्यूला कवटाळले त्यांनी //६//

भारताचा वीर लाडका सुपुत्र
तेरा वर्षे प्याला काळे पाणी
आज आहे त्यांची जयंती
सर्वांच्या डोळ्यातून ओघळणार
अश्रूंचे पाणी //७//

जय हिंद-जय हिंद-जय हिंद
सर्व मिळून करू त्यांना प्रणाम
जगी अमर त्यांचे व्यक्तिमत्व महान
मुखा-मुखात बसले,
विनायक सावरकर नाम //८//

वर्षा भाबल.

— रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९