प्रसिद्ध गुजराती कवी अखा ह्यांच्या कवितेचे सौ. अनला बापट यांनी मराठीत केलेले रूपांतरण पुढे देत आहे.
इतरही भाषातील कवितांचे रूपांतरण/अनुवाद याचे स्वागत आहे.
– संपादक
तिलक करण्यात त्रेपन गेले,
जपमाळेचे बंध तुटले
तीर्थ फिरून दुखले चरण
तरी न पोहचले हरिशरण
कथा ऐकून ऐकून फुटले कान
अखा म्हणे तरी न आले ज्ञान
एका मुर्खाला सवय जाणे
प्रत्येक दगडास देव म्हणे
पाणी पाहून करे स्नान
तुळशी पाहता तोडे पान
अखा म्हणे हे नुसते देखावे
अनेक परमेश्वर असती का रे ?
एका एका काय म्हणे मोठे बाप
उज्जड शेतात ढोलकीची थाप
अंध अंध अंधारात भेटले
जसे तीळात भुशी मिळते
ना झाला रवा न लाह्या झाल्या
म्हणे अखा मला कळाल्या
देहाभिमान होते पावशेर,
विद्या घेता झाले शेर
चर्चा होता तोला झाला
गुरू होताच मणात गेला
अखा, असे हलक्या पासून भारी होतात
आत्मज्ञान ते मुळापासून हरवतात
अंधळा सासरा आणि घुंघटदार सून
कथा ऐकायला निघाले कुटुंब पूर्ण
बोलले काही आणि ऐकले काही
डोळ्यातले काजल गालावर वाही
खोल विहीर आणि फाटक्या भिस्ती
शिकले, ऐकले आठवण नसत….
— मूळ रचना : अखा
— मराठी अनुवाद : सौ. अनला बापट, राजकोट.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800