मला आणि मिसेसला दोघांना
कोरानाची लागण झाली
भितीने आमच्या पायाखालची
जमिनच सरकली
डोळ्यासमोर काळोख पसरला
पोटात भितीचा गोळा आला
कळेनासं झालं कसा आला
अचानक हा घाला
सांगायला आनंद वाटतो आता
बाहेर आलो यमाच्या तावडीतून
प्रत्यक्ष अनुभव घेतला डॉक्टर
नर्सेस झटतायत जीव तोडून
सफाई कामगार, पोलीस सर्वच
झटतायत जीव धोक्यात घालून
सीमेवर पहारा देतायत सैनिक
तळ हातावर प्राण घेऊन
या सर्वांमध्येच दिसतोय मला
साक्षात् परमेश्वर
क्रुतज्ञ राहू, प्रार्थना करू सर्वजण
त्यांच्यासाठी आयुष्यभर
कळत नाही कसे मानू आभार
या देवळा बाहेरच्या देवांचे
जीव वाचवले त्यांनी तळमळीने
हजारो भारतीयांचे

– रचना : मदन लाठी

Khoop chan
खूपच सुंदर
खूपच छान कविता केली.अभिनंन!!!
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!