वंदना अत्रे या पत्रकार आणि माध्यम संशोधिका आहेत. अभिजात भारतीय संगीत या क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांच्या मुलाखतींवर आधारित विपुल लेखन त्यांनी केलेले आहे.
नाशिकच्या भारती ठाकूर यांनी स्थापन केलेल्या “नर्मदालय” या संस्थेच्या कामाशी त्यांचे जवळून संबंध आहेत. या संस्थेच्या गेल्या वर्षीच्या नर्मदा जयंती या कार्यक्रमात त्यांनी आपला “मुसाफिर” हा दृकश्राव्य कार्यक्रम सादर केला होता. तो मी पाहिला होता.अभिजात भारतीय संगीत शिकण्यासाठी जे अनेक परदेशी कलाकार भारतात येतात त्यांचा अभ्यास सध्या त्या करीत असून तोच या कार्यक्रमाचा विषय आहे.
हे जग रसिकांना खूप अनोळखी आहे आणि त्यामुळे नवीन आहे. त्या अर्थाने हा एक अनवट प्रयत्न आहे. या कार्यक्रमाचा पुण्यातील दुसरा प्रयोग येत्या 22 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता भारतीय विद्या भवनच्या सभागृहात होणार आहे. दीड तासाचा हा कार्यक्रम आहे.
रसिकांनी या कार्यक्रमासाठी अवश्य यावे अशी इच्छा आहे. आपल्या परिवारातील इतरांनाही पाहायला सांगावे अशी विनंती या निमंत्रणाद्वारे करीत आहे.
— निमंत्रक : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800