शंभर वर्षाच्या इतिहासाची साक्षी
विस्तीर्ण, अथांग समूद्राच्या लाटांवर स्वार
स्वातंत्र्याची ज्योत धरूनी हाती
अढळ, कणखर स्थितप्रज्ञ उभी
प्रखर नजरेतील जरब
डोक्यावरी सात भाले पेलत
ब्रान्झची तांबूस मूळ चकाकी
वारा, पाऊस ऊन्हाने झालीस हिरवी
फ्रांन्सच्या शिल्प कलेचे सौंदर्य
तीनशे चोपन्न पायर्यांची ऊंची
जगातील प्रवाश्यांचे आकर्षण
सतत प्रज्वलीत मशाल
अमेरिकेची शान, मान, अभिमान
पुतळ्यांचे दुःख तुलाही सुटले नाही
दहशतवादाची भळभळणारी जखम
समोरील स्मृतीस्तंभ करुणा वाहणारे
तुझ्या समोरील गगनचुंबी इमारती
इतिहासाला जागवत उभ्या
ब्रायन पार्कमधे बहरलेल्या चेरी
स्प्रिंगमधील लाल, केशरी पर्ण
ख्रिसमससाठी सजलेले न्यूयाॅर्क
परेडसाठी निघालेला सॅन्टा, रेनडीयर
अबाल वृध्दांच्या चेहर्यावरून ओसंडणारा आनंद
बर्फाने अच्छादलेले वृक्ष
समाधीस्त निष्पर्ण दुःख झेलणारे
स्वातंत्र्य देवता तू साक्षी आहेस
अमेरिकेच्या वैभवाची, करुणेची
कोणत्याच पुतळ्याची सुटका नसते
म.गांधी, लो.टिळक, सावरकर, बोस,
आंबेडकर, वल्लभ भाई पटेल
निसर्ग आणि मानवाच्या सनातन दुःखातून…
— रचना : डॉ अंजली सामंत. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800