Friday, November 22, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टलवर प्रसिध्द होत असलेल्या “मेरा जूता हैं जपानी” या आमच्या जपान दौऱ्यावर आधारित पर्यटन लेखमालेस वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. खुप पत्रे आली आहेत. त्यामुळे ती पत्रे आपल्या या नियमित सदरात न घेता, स्वतंत्रपणे प्रसिध्द करावीत असे आम्ही ठरविले आहे.

तसेच “आम्ही अधिकारी झालो” या मी लिहिलेल्या – संपादित केलेल्या आणि न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या राज्यपाल श्री रमेश बैस यांनी गौरविलेल्या पुस्तकास फारच छान प्रतिसाद मिळत आहे. पहिली आवृत्ती संपली आहे. दुसरी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या पुस्तकाविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया सुध्दा या सदरात न घेता त्या स्वतंत्रपणे प्रसिध्द केल्या आहेत.

उर्वरित लेखनावरील प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला,
देवेंद्र भुजबळ (संपादक)
☎️ 9869484800

१. मा. राधिका ताई,
आपला क्रमशः मधील शाळा नंबर १२ हा लेख वाचला. कॉन्व्हेंट पेक्षा नगरपालिकेच्या मराठी शाळेला कमी लेखणारे अजूनही काही पालक आहेत. बालपणी तिथे अनुभवलेले बालपण आज फक्त आठवणीत गेले आहे. आई, वडील यांची आठवण …. आडनाव बदलणे साठी …. दप्तर या साऱ्या गोष्टी आता फार कमी आहेत. पाटीच्या ऐवजी आधुनिकता आली. ह्या सगळ्या गोष्टी मला माझं बालपण आठवण्याकडे खेचून नेतात, पण न कळत्या वयापासून कळत्या वयात जे भोगलं, सोसलं त्याने बालपणातील गत काळाचे क्षण दृष्टीच्या नजरेआड गेलेत. पण, आपल्या लेखाने बालपण काय असतं याची जाणीव झाली.
वाचावे असे काही….
यात आपले लेखन असते. त्याच्या वाचण्याचा आनंद वेगळाच.
— अरुण पुराणिक. पुणे

२. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या विषयी केलेले सर्वच लेखन
अतिशय उत्तम दर्जाचे आहे. संपूर्ण अंक अतिशय सुंदर, वाचनीय आहे. त्यासाठी माननीय भुजबळ सर व अलका मॅडम ह्यांचे अभिनंदन आणि आभार .
— मृदुला राजे. जमशेदपूर.

३. सुधाकर तोरणे यांनी “वारसायान” पुस्तकाबद्दल दिलेली माहिती
उद्बोधक वाटली.
— अशोक डुंबरे.
(निवृत्त दूरदर्शन संचालक), पुणे.

४. “महान डॉक्टर माईसाहेब आंबेडकर” या लेखातून छान माहिती
मिळाली.
— प्रा अनीसा शेख. दौंड.

५. अरुणा मुल्हेरकर यांची चंद्रकांता वृत्तातील सोड ना अबोला ही
काव्यरचना खूप आवडली. अतिशय तरल भाव उलगडणारी..
— राधिका भांडारकर. पुणे

६. कॅन्सरचा बाऊ नको…
खूप छान सकारात्मक मुलाखत.
‘सोड ना अबोला’ खूप छान रचना.
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ खरोखरच खूप छान अभ्यासपूर्ण लेख
— अरुणा गर्जे. नांदेड.

७. वैविध्यपूर्ण दिवाळी अंक, ‘ई-काव्यानंद’ विशेषांक, वृत्तपत्रे व
इतर लिखित माध्यमांतून आपल्या सशक्त लेखणीनं वाचकांना अंतर्मुख करणारे लेखक म्हणजे श्री. नागेशजी शेवाळकर. ‘साहित्य तारका’ या सदरातील त्यांचा हा लेख नुकताच वाचनात आला. परिपूर्ण लेख कसा असावा, याचं हे उत्तम उदाहरण आहे. श्री. शेवाळकर यांची लेखनशैली ‘विशेष’ या श्रेणीत मोडणारी आहे. ‘ई-काव्यानंद’ या डिजिटल अंकात माझेही काही लेख प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे याच डिजिटल अंकामध्ये समाविष्ट असलेल्या त्यांच्या विविध साहित्यप्रकारांचा अभ्यास मी जवळून केला आहे. ते अतिशय उत्कृष्ट लेखनकर्ते आहेत. सदर लेखाबाबत सांगायचं झालं तर, विस्तृत कालपट कवेत घेऊन त्यांनी उलगडलेला डाॅ. माईसाहेबांचा प्रवास वाचकांसमोर जिवंत उभा राहतो. लेखात समाविष्ट केलेले वैधानिक दाखले हे देखील लेखास एक वेगळी उंची प्राप्त करून देतात. सदर लेखनकृतीत अध्ययन, आकलन व अनुभव यांची त्रिपेडी गुंफण झालेली दिसून येते. श्री. नागेशजी शेवाळकर यांच्या रूपात ‘न्युज स्टोरी टुडे’ या आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टलला सकस विचारांचे उत्तम लेखनकर्ते गवसल्याबद्दल समस्त टीमचे हार्दिक अभिनंदन.
“You can be a victim of cancer, or a survivor of cancer. It’s a mindset.” – Dave Pelzer

हल्ली दिवसेंदिवस वाढत जाणारा ताणतणाव, धावपळीची जीवनपद्धती, असंतुलित आहार, प्रदुषणाचा वाढता स्तर, व्यसनाधीनता, या व अशा जटिल कारणांमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार मानवी आयुष्यात डोकावू लागले आहेत. कर्करोगाच्या चक्रव्युहातू बाहेर पडणं जरी तितकसं सोप्पं नसलं, तरी ते अशक्यंही नाही. सौ. अलकाजी भुजबळ यांनी स्वानुभव कथन करताना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना त्यांनी कशा पद्धतीनं केला, हे सदर मुलाखतीतून व्यक्त केलं आहे. ‘कॅन्सरचा बाऊ नको, योग्य उपचारांनी मात शक्य’, प्रथमदर्शनी हे शीर्षक वाचकांचं लक्ष प्रकर्षानं वेधून घेतं. याच विषयावर आधारित ‘काॅमा’ ही त्यांची साहित्यकृती देखील प्रकाशित झाली आहे. त्यांच्या या अनुभवकथनात्मक लेखांशातून कर्करोगग्रस्त रुग्णांना जगण्याची नवी उमेद नक्कीच मिळेल. कर्करोगासारख्या संवेदनशील विषयावरती मुक्तपणे संवाद घडून यावा, यासाठी स्वतः कॅन्सरमुक्ता असलेल्या अलकाजी भुजबळ यांनी हा घेतलेला पुढाकार, ही अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. कॅन्सर (Cancer) मध्ये दडलेला शब्द ‘कॅन’ (Can) चा इंग्रजीत शब्दशः अर्थ ‘be able to’ असा होतो. अर्थात, ‘एखादी गोष्ट करू शकणे’. जर ती गोष्ट तुम्ही ‘सर’ करू शकलात म्हणजे तो अडथळा पार झाला म्हणायचा. हेच ‘कॅन्सर’ च्या बाबतीत आपण म्हणू शकतो. प्रगत वैद्यकीय उपचारांद्वारे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लढाई जिंकता येते; पण त्यासाठी लढवय्याचं मन खंबीर असणं आवश्यक आहे. मानवी शरीरालाही ‘motivation’ ची गरज असते. ‘मन’ हे शरीराला प्रोत्साहित करण्याचं कार्य सक्षमपणे करतं असतं. शेवटी, मानसिक आरोग्य उत्तम राखणं गरजेचं आहे. सोबत आत्मविश्वासंही तितकाच महत्वाचा. अशा परिस्थितीतून जाताना आपल्या प्रियजनांची लाभलेली अमूल्य साथ, त्यांचा मायेचा एक शब्द, त्यांचं आपल्यासोबत असणं, ह्या गोष्टी मन व शरीर या दोहोंनाही उभारी घेण्यासाठी मदत करतात.
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा

९. श्री देवेंद्र भुजबळ आणि सौ अलका भुजबळ यांचे त्रिवार
अभिनंदन त्रिवार अभिनंदन अशीच पुस्तक लिहित जा, माझा आशिर्वाद तुमच्या पाठीमागे आहे लक्षात ठेवा. फक्त ऐक करा “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकामधील ऐक गोष्ट आपल्या ग्रुप लिहून पाठवा हि विनंती.
— रवींद्र साळवी. मुंबई दूरदर्शन.

१०. दुर्मीळ पुस्तके : समारोप, या लेखावरील अभिप्राय
खूप मौलिक कामगिरी केली आहे तुम्ही. तुमच्या या आविष्कारासाठी तुम्हाला ‘न्यूज स्टोरी टुडे’चे दर्जेदार व्यासपीठही मिळाले… खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ! तुमच्या स्वतःच्या जडणघडणीविषयी तुम्ही अतिशय उत्तम लिहाल अशी खात्री आहे… त्या लेखनाची प्रतीक्षा आहे
— प्रल्हाद जाधव. माजी संचालक (माहिती)

सर नेहमीच छान आठवणी आपण जपता.
— नवनाथ दळवी

बहुत सुंदर
— विजय पवार

अरे व्वा… अभिनंदन सर…. सातत्याने दुर्मिळ पुस्तकांची माहिती आपण दिलीत…
— प्रा गजानन शेपाळ

अभिनंदन ! मी साहित्याचा विद्यार्थ्यी नसलो तरी यानिमित्ताने थोडीफार माहिती मिळाली. आपले लेखन अतिशय सुंदर आहे. असेच लिहित राहावे, या मङ्गलकामनेसह
— श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)

छान लिहिले आहे । उपक्रम चांगला आहे । थोडी विश्रांती घेऊन परत सुरु करावा । पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
— अजय देशमुख.

११. खूप छान आठवणी आहेत सुहासिनी बाईंच्या.मन भरून आले
त्यांचे ते रूप, कामाचा झपाटा, उरक, विद्वत्ता आठवून.
— स्वाती वर्तक. मुंबई.

१२. सर्वच लेख उत्तम आहेत.
“आठवणीतील सुहासिनीबाई” वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूपच छान.
— वंदन कुळकर्णी.
निवृत्त दूरदर्शन निर्माता, ठाणे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments