‘बांबू’ गॅंग, ‘कोयता’ गॅंग
कुठल्या दिशेने पुणे
कायदा आणि सुव्यवस्था
अधिक ऐवजी उणे
याच्या टोळ्या, त्याच्या टोळ्या
सोनसाखळ्या घालणारे ‘वळू’
‘सांस्कृतिक ‘राजधानीची’ वैशिष्ट्ये’
आता लागलीय कळू
‘हुक्का पार्लर’ मस्तीत चालू
जिकडे तिकडे धूर
बार, पब, डिस्कोथेकला
आलाय नुसता पूर
चौकाचौकात भाई जन्मले
थोरवी गाणारे फलक
‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’
याचीच ही तर झलक
फुले, टिळक, आगरकर, गोखले
यांचे ऐतिहासिक शहर
हल्ली मात्र वेगळ्याच ‘धुंदीत’
एकूणच सगळा कहर
काही ओळीत मावेलच कसा
‘महिमा’ बदलत्या पुण्याचा
सोने देणारी कोंबडी ही तर
बोक्यांना गोळा लोण्याचा
माणसे चिरडणाऱ्या आरोपीचीही
बडदास्त असते मोठी
‘माया’ळू, कनवाळू
पोलीसांमूळे पिझ्झा बर्गर पोटी
पर्वती उभी निमूटपणे
निःशब्द शनिवारवाडा
आगाखान पॅलेस हळूच म्हणाला,
कसेबसे दिवस काढा
लिहिती मुरारी काका
लौकिक पाहून पुण्याचा
नमन करायला वाका !
— रचना : मुरारी देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मुरारी म्हणे असे काव्यात गुंफून कविता कमी वाचायला मिळतात. आपल्या नावावरून
मुरारबाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची पुरंदरच्या लढाईची आठवण झाली. पुण्याची दशा आणि दिशा बदलत्या काळानुसार सुधरते आहे!
भयंकर बदलते पुणे स्थिती काव्य मैफिलने मांडली आहे.
गोविंद पाटील सर जळगाव.