श्री रामकृष्ण नेत्रालय हे २००३ पासून कार्यरत आहे. ठाणे, मुलुंड, वाशी, सीवूड्स येथे या नेत्रालयाच्या शाखा आहेत.
मी स्वतः रामकृष्ण नेत्रालयाच्या वाशी येथील शाखेत माझ्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी नियमित जात असतो. अतिशय तज्ञ डॉक्टर, तत्पर सेवा, आत्यंतिक स्वच्छता, प्रसन्न वातावरण, अद्ययावत यंत्रणा ही या नेत्रालयाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढतच चालली आहे.
चेंबूर परिसरातील रुग्णांच्या मागणीमुळे श्री रामकृष्ण नेत्रालयाची शाखा नुकतीच चेंबूर येथील सेंट्रल अँव्हेन्यू रोड, डायमंड गार्डन जवळ, चेंबूर येथे सुरू करण्यात आली. या नूतन शाखेचे उद्घाटन मनसे अध्यक्ष, श्री राज ठाकरे यांच्या शुभहस्ते नुकतेच झाले. यावेळी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने हेही उपस्थित होते.
या नेत्रालयात सर्व थरातील लोकांना जागतिक दर्जाची सेवा (आय केअर) उपलब्ध होणार आहे. डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांसाठी लागणारे सुपर स्पेशालिस्ट तज्ञ डॉक्टर व आधुनिक तंत्रज्ञान येथे उपलब्ध होणार आहे. कॅटरॅक्ट, ग्लोकोमा, रेटिना, पीडियाट्रिक, लेसिक, कॉर्निया यासारख्या सुपर स्पेशालिस्ट सर्विसेस येथे परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना मिळतील. नेत्रालयाच्या यादीवरील विमा कंपन्या, केंद्र सरकारची आरोग्य सेवा (CGHS), एफसीआय (FCI), आरसीएफ (RCF), जेएनपीटी (JNPT) यांच्या अधिकारी, कर्मचारी यांना देखील येथील सुविधांचा लाभ मिळेल असे डॉ नितीन देशपांडे आणि डॉ प्राजक्ता देशपांडे यांनी सांगितले.
चष्म्यापासून सुटका मिळवण्यासाठीचे लेसिक तंत्रज्ञान सगळ्यांना सर्वश्रुत आहे. श्री रामकृष्ण नेत्रालयात याबाबतचे नवीन तंत्रज्ञान एटॉस स्मार्ट साईट लेसिक (ATOS, Smart Sight Lasik) हे आले आहे. अतिसूक्ष्म छेदातून नो फ्लॅप ऑल लेझर तंत्रज्ञानाने लेसिक (Lenticular) सर्जरी अतिशय सुरक्षित आणि वेदना विरहित होणार असून हे तंत्रज्ञान पश्चिम भारतात सर्वप्रथम येथे आणले गेले आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये देखील डिजिटल गाईडन्स, कॅटरॅक्ट सर्जरी (कॅलिस्टो) झाईस, जर्मनी (Callisto) (Zeiss Germany) हे नवीन तंत्रज्ञानही येथे उपलब्ध आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी, “ब्लेडलेस रोबोटिक लेझर एली (ALLY)” लेझर कॅटरॅक्ट सर्जरीचे एली लेंसार यूएसए (ALLY Lensar U.S.A.) हे तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम श्री रामकृष्ण नेत्रालयाने आणले आहे. या तंत्रज्ञानाने वेदनारहित, अचूक शस्त्रक्रिया होतात. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे तंत्रज्ञान आहे. अग्रणी काच बिंदूचे अत्याधुनिक मायक्रो इनसीजन ग्लोकोमा सर्जरी (Micro Incision), (Istent) रेटिना सर्जरीसाठी, “सुचरलेस ऍडव्हान्स विट्रेक्टटोमी (Vitrectomy)” सर्जरीसाठी कॉन्स्टेलेशन अल्कोन यूएसए (constellation Alcon, USA) हे देखील येथे असणार आहे.
लेझर असिस्टेड बुबुळांच्या सर्जरी, पूर्ण बुबुळ न बदलता केवळ आजारी भागाचा पापुद्रा बदलण्याची “(लॅमेलर) (Lamellar) कॉर्निया सर्जरी” येथे उपलब्ध होणार आहे.
लहान मुलांमध्ये चष्म्याच्या वाढत्या नंबराचे नियंत्रण करण्यासाठी, “मायोपिया क्लिनिक” देखील येथे कार्यरत असेल. नेत्र रुग्णासाठी सर्व नेत्रसेवा एका छताखाली येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. कन्सल्टंट, ऑप्टोमेट्रीस्ट आणि शंभराहून अधिक प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी हे मुंबईकरांच्या सेवेत हजर असतील.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुप छान सुंदर उपयोगी माहिती धन्यवाद 🙏🏻
सुंदर लेख
आम्ही सर्वांनी (डाॅक्टरांच्या भावंडांनी) पुण्याहून येऊन आवर्जून उपस्थित राहून हा उद्घाटन सोहळा व नेत्रविकारावरील डाॅ. देशपांडे कुटुंबातील सर्वांचे यशस्वी योगदानाचे कौतुकास्पद वर्णन अनुभवले. आपण विषद केल्याप्रमाणे ही अत्याधुनिक सुविधा चेंबुरकरांनाच नव्हे तर सर्व गरजूंसाठीही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेच. आधीच्या पाचही केंद्रांप्रमाणे येथील सुविधा निर्माण करण्याबद्दल डाॅ. देशपांडे कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन, व हार्दिक शुभेच्छा
महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देवेंद्र साहेब..!!