नमस्कार, मंडळी.
अमेरिकेत सॅनहोजे येथे बृहनमहाराष्ट्राचे ३ दिवस मोठे संमेलन भरत आहे. तिथे आपल्या पोर्टल च्या लेखिका, कवयित्री चित्रा मेहेंदळे उपस्थित रहात आहेत.
या संमेलनाचा वृत्तांत त्या देणार आहेतच. तथापि, या संमेलनावर त्यांनी केलेली कविता आज वाचू या.
– संपादक
आगळे वेगळे हे संमेलन
आनंदे भरले मराठी मन
अमेरिकेत होणार मिलन
मायमराठी ला करू नमन
कोण कुठले एकत्र येणार
मराठी म्हणूनच भेटणार
जिवाभावाचे होऊन जाणार
मग आठवणीत रमणार
किती उत्साह, किती कल्पकता
किती योजना, किती संकल्पना
कार्यक्रमाच्या तयारी करता
मदतीचे हात आयोजकांना
जपल्या सगळ्या अलंकारांना
मराठी लावणी भक्ती भावांना
रत्न निवडूनी बोलाविले त्यांना
साजऱ्या होणाऱ्या या संमेलना
ढोल ताशा दुमदुमणार
या मंगल, प्रसन्न सोहळ्यात
सर्व आनंदे आकंठ बुडणार
आपल्या “काय बे“ संमेलनात
— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800