‘बाल सुरक्षा व शिक्षण’ या सामाजिक विषयावर कार्य करण्यासाठी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टने. बदलापूर ट्रान्सपोर्ट, बदलापूर पूर्व येथे ‘माई बाल सदन’ हे बालगृह नुकतेच सुरु केले आहे.
समाजातील अंध व अपंग पालकांची मुले तसेच एकल पालक जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्या मुलांचे भवि्तव्य हे विपरीत परिस्थितीमुळे अंधारात असते. अशा मुलांचे भविष्य घडविण्याच्या उद्देशाने संस्थेने 6 ते 12 वर्ष वयोगटातील 25 मुलांची क्षमता असलेले हे बाल सदन सुरु केले आहे.
या बाल सदनाचे उदघाटन दि. 2 जुलै 2024 रोजी ‘अष्टगंधा अध्यात्मिक परिवार’ बदलापूरचे संस्थापक श्री प्रमोद जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्हिजन इंसाईट फाउंडेशन, डोंबिवली चे संस्थापक श्री हेमंत पाटील, श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, विश्वस्त श्री विजय लखाणी व संस्थापक सचिव श्री जगदीश जाधव उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाल सदनातील प्रवेशित बालकांचे स्वागत करण्यात आले. संस्थेच्या युवा गटातील शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करून संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सामाजिक भान जपणाऱ्या शुभचिंतकांनी या माई बाल सदनास भेट देऊन येथील बालकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करावे असे आवाहन संस्थेच्या विश्वस्तानी केले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800