पुरुषांची मक्तेदारी असणारी अजूनही अनेक क्षेत्रे आहेत.
त्यातीलच एक म्हणजे व्यंगचित्र कला. मुळातच स्त्रियांना विनोद बुध्दी कुठे असते ? असे म्हटल्या जाते.
पण मूळ बडोदा येथील पण सध्या बंगलोर येथे वास्तव्य असलेल्या दिपाली वझे या चांगल्या व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी एम एस युनिवर्सिटी, बडोदा येथून अप्लाईड आर्ट्स मधे 2004 बॅचलर इन फाईन आर्टस ही पदवी प्राप्त केली आहे. त्या
व्यवसायाने ग्राफिक डिजाइनर, चित्रकार तसेच कॉमिक आर्टिस्ट आहेत. आपल्या कल्पनाशक्तीच्या आधाराने चित्र काढण्याची कला त्या आपल्या विद्यार्थ्यांनाही शिकवतात. मराठी साहित्यात चारोळी पासून कविता गझल लिहिणे तसेच एखाद्या विषयावर लेख लिहिणे हा त्यांचा छंद आहे.
ह्रदयस्पर्शी गझलांसोबत आता त्या व्यंग चित्रामार्फत वाचक रसिकांना हलकंफुलकं काही देण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्ष निसर्गचित्र, पदार्थचित्र, रियलिस्टिक पोर्ट्रेट पासून कॅरिकॅचर पर्यंत त्यांचा चित्रकलेचा प्रवास तसाच साहित्यिक प्रवास अविरतपणे चालू आहे.
पाहू या त्यांची काही व्यंगचित्रं…
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
Nice art work, keep it up. Congratulations.
आशयघन व्यंगचित्रे .
छान. मार्मिक 👍🏻👏🏻👌🏻
मस्त दीपाली👌👌👍