“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे”, “झाडे लावा, झाडे जगवा” तसेच “आमचे बदलापूर, हिरवेगार बदलापूर” सह ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करीत कुळगाव-बदलापूर दिव्यांग विकास संस्थेच्या दिव्यांग बांधव, पालक, हितचिंतकांसह वय वर्ष ४ बालगोपाळ ते ७८ वर्षाच्या आजीनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित वृक्ष दिंडीत सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षण संदेश दिला.
दिंडीच्या अंतिम टप्प्यात सहभागी झालेल्या बदलापूर येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डाॅ शंकुतला चुरी यांचा दिंडी प्रमुख श्री अनिल चाळके यांनी तुळशीचे रोप देवून सत्कार केला. या आगळ्यावेगळ्या दिंडीचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
विठ्ठल मंदिर देवस्थानचे विश्वस्त राम शेटे, अनिल पातकर, राम पातकर यांनी दिंडी प्रमुखांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला.
रामू गडकर यांनी विठ्ठल रखुमाई ची छोटीशीच सुबक मूर्ती तर विठ्ठल ठाकरे यांनी वृक्ष रोपे आणि पर्यावरण संरक्षण संदेश फलक देऊन सहकार्य केले.
अँटी व्हायरस आर्मी, बालभवन बदलापूर या समविचारी संस्थेबरोबर सर्वांनीच हा जनजागृतीपर स्तुत्य उपक्रम परिश्रमपूर्वक यशस्वी केल्याबद्दल दिंडी प्रमुखांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800