१. आपल्या पोर्टलवर अनेक दुर्मिळ व नवीन पुस्तकांचा रसग्रहणात्मक परिचय नेहमी येत असतो. त्यामुळे वाचक चळवळीला चांगला हातभार देवेंद्र व अलकाजींनी या पोर्टलच्या माध्यमातून लावला आहे. हे फार मोठे कार्य अखंडपणे करीत आहेत ही अभिनंदनीय बाब आहे.
नुकतेच ख्यातनाम साहित्यिक डॉ राजन गवस यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, “वाचन महत्त्वाचं आहे असं म्हणत राहायचं, पण त्यासाठी ठोस काहीही करायचं नाही. यातून आपलं भविष्य कसं घडणार ? आपण एखादा विचार सर्व दूर कसा पोहोचवता येईल याची पद्धत व शास्त्र तयार करण्याचा विचार कधीही केलेला नाही.” थोडक्यात वाचन वाढ व्हावी यासाठी आपण पद्धतशीरपणे काहीच केलं नाही. इंग्रजीमध्ये वाचन वाढीला चालना देणाऱ्या पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचं ‘बुक्स ऑन बुक्स’ समृद्ध झालं आहे हे त्यांचे विचार वाचल्यावर मला देवेंद्र व अलकाजींचा खूप अभिमान वाटला, कारण ते नित्य नियमाने पुस्तकांतील विचार सर्व दूर पोहोचवत आहेत.
आपण सादर केलेल्या ‘न्युज स्टोरी टुडे ने आम्हाला काय दिले’ या चारही भागातील मान्यवरांचे अभिप्राय तसेच प्रतिक्रिया अतिशय उत्तम व बोलक्या असून या वेबपोर्टलचे बळ चांगल्याप्रकारे वाढवत आहे ही दिलासा देणारी गोष्ट आहे.याबाबत देवेंद्रजी व सौ. अलकाताईंच्या प्रयत्नांचे आणि अखंड परिश्रमाचे व्यापक प्रमाणात कौतुक झाले पाहिजे असे मला तरी मनापासून वाटते.
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक नासिक.
२. न्युज स्टोरी टुडे पोर्टल च्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा.
दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ गिर्यारोहक सोमनाथ समेळ सर यांच्या रायगड प्रदक्षिणा मोहिमेत मी उपप्रमुख म्हणून कार्यरत असायचो. १९९२ च्या मोहिमेत देवेंद्र भुजबळ साहेब आणि अलका भुजबळ हे दोघे पती पत्नी सहभागी झाले होते. हि पहिली ओळख. दोघेही हसतमुख. मी भारतीय सेनादलाच्या अभियांत्रिकी विभागात वरीष्ठ तंत्रज्ञ पदावर मुंबई कुलाबा येथे कार्यरत होतो. त्यामुळे नेहमीच भेटीगाठी. त्यांच्या कार्यालयात साहित्यिक, पत्रकार, कलावंत यांचा गोतावळा असायचा. अनेक मोठ्या व्यक्तींची त्यांनी ओळख करून दिली. आता नावे आठवत नाही पण गझल नवाझ भीमराव पांचाळे साहेब त्यापैकीच एक नाव. या पोर्टल मध्येच कोरोना काळात आलेल्या एका लेखामुळे सुधीर थोरवे हा माझा शालेय मित्र मिळाला. जो मित्र ठावठिकाणा शोधत होता. या पोर्टल मुळे मी माझ्या शालेय मित्र मंडळीत सामिल झालो.
सैनिकांवरील एका लेखामुळे विस्मृतीत गेलेल्या आमच्या बदलापूर येथील कविताई कविमंडळा च्या सदस्या स्वाती दामले मॅडम भेटल्या.
पोर्टल चे आभार मानावे तितके कमीच आहे. या पोर्टल चे लवकरच वटवृक्षात रुपांतर होवो हिच परमात्मा चरणी प्रार्थना.
— अनिल शेवंती कृष्णा चाळके.
पर्यावरणप्रेमी -गिर्यारोहक. अंबरनाथ.
३. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात. काहींना ते व्यक्त करण्याची आवड असते, परंतु काही स्वभावानुसार व्यक्त करू शकत नाही. आपण आपल्या पोर्टलच्या माध्यमातून अशा व्यक्तींना प्रोत्साहित करत असतात. आपल्या या प्रोत्साहनामुळे काही लेखक जन्माला आले ही खरोखरी उल्लेखनीय बाब आहे. काहींमध्ये लेखनाची आवड निर्माण झाली तर काहींमध्ये वाचनाची. खरंच, फारच छान कार्य या पोर्टलच्या माध्यमातून होत आहे. विशेष म्हणजे आपल्या या पोर्टलच्या माध्यमातून अनेक देश विदेशी वाचक, लेखक जोडले गेले. खूप खूप अभिनंदन आणि न्यूज स्टोरी पोर्टल साठी आमच्या थोरवे कुटुंबीयांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
— सुधीर थोरवे. नवी मुंबई.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800