खरंच, जीवन म्हणजे काय ? हा मला वाटते, मलाच नाही तर आपल्यालाही पडणारा प्रश्न असेल.
तसे तर अनेक धर्म ग्रंथांनी, तत्ववेत्त्यानी, विचारवंत, लेखक, कवी, गीतकार, चित्रपट, नाटक, अशा अनेक जणांनी आपापल्या परीने जीवनाची व्याख्या केली आहे, यशस्वी जीवन जगण्यासाठी काय केले पाहिजे, काय करू नये हे ही सांगून ठेवले आहे. मग इतकं सर्व ज्ञान भांडार असतानाही, कदाचित आपण ते बऱ्यापैकी वाचलं असलं तरी पुन्हा पुन्हा हा प्रश्न मनात रेंगाळत का राहतो ? प्रत्येकाची जीवनाची व्याख्या, अनुभव, मते, विचार, दृष्टिकोन हे वेगळे का असतात ?
बऱ्याचदा आपण सहजपणे म्हणून जातो, “जीवन त्यांना कळले हो !” पण खरंच आपण ज्यांच्या बाबतीत हे म्हणतो, त्यांना तरी जीवन कलळे असते का ?
जीवनाविषयी आपल्याला काय वाटते ? आपले विचार, दृष्टिकोन, मते, अनुभव सर्वांना सांगा. शब्द मर्यादा ५०० शब्द. तर वेळेची मर्यादा शनिवार, ३ ऑगस्ट २०२४ दुपारी ३ पर्यंत. आपला मजकूर वर्ड फाइल मध्ये आपल्या नेहमीच्याच म्हणजे
9869484800 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवा.
आपली
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800