श्रावण आला, श्रावण आला
पाऊस घेऊन श्रावण आला
चिंब, तृप्त ही धरती झाली
हिरवा, हिरवा शालू ल्याली
लज्जेची ती धूसर लाली
हळू पसरली तिचिया गाली
चराचराला आनंद झाला
पाऊस घेऊन श्रावण आला
मेघाच्छादित आज गगन हे
हर्षित मन अन् हर्षित तन हे
वाऱ्यालाही गंध नवा हा
देई श्रावणाचे आगमन हे
वर्षत गर्जत श्रावण आला
पाऊस घेऊन श्रावण आला
— रचना : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800