Sunday, September 14, 2025
Homeसाहित्यहास्य तुझ्या गालावर

हास्य तुझ्या गालावर

गोड गोजिरी लाज लाजरी
नजरेचा मारते तीर
खूप सुंदर दिसते
जेव्हा असतो राग नाकावर
तेव्हा असते हास्य तुझ्या चेहऱ्यावर. ….//१//

सुमधुर गाते गाणी
कंठात लागला सुर
गुबरे गुबरे गाल तुझे
पडते खळी गालावर
तेव्हा असते हास्य तुझ्या चेहऱ्यावर …..//२//

ठुमकत चालते चाल
घेऊन कमरेवर घागर
मनाशी जोडले नाते
नजरेवर पडली नजर
तेव्हा असते हास्य तुझ्या चेहऱ्यावर …..//३//

रिमझिम पावसाच्या सरीत
थेंब पडले डोक्यावर
पाण्याचा आला ओघळ
येऊन थांबला ओठावर
तेव्हा असते हास्य तुझ्या चेहऱ्यावर …..//४//

साखरेसारखी गोडी
आहे तुझ्या जिभेवर
जपून आपुलकीची नाती
ठेवते हात हातावर
तेव्हा असते हास्य तुझ्या गालावर…..//५//

— रचना : सौ भारती वसंत वाघमारे. मंचर, जिल्हा पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा