Wednesday, January 15, 2025
Homeबातम्यादै. हिंदुस्थान व्रतस्थ पत्रकारिता जोपासली - नितीन गडकरी

दै. हिंदुस्थान व्रतस्थ पत्रकारिता जोपासली – नितीन गडकरी

संतांची आणि नररत्नांची भूमी असलेल्या अमरावतीच्या पावन भूमीतील दै. हिंदुस्थान वृत्तपत्राची ७५ वर्षांची सकारात्मक वाटचाल, आदर्श पत्रकारिता आणि अमृत महाेत्सव गाैरवान्वीत करणारा आहे. वीर वामनराव जाेशी व पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांनी दिलेला विचार आणि दृष्टी पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे, स्व. अरूण मराठे यांनी आयुष्यभर जाेपासली. आता मराठे परिवाराची तिसरी पीढी हा विचारांचा वारसा भक्कमपणे जाेपासत आहे याचे काैतुक आहे. मुळात आजच्या वेगाने बदलत्या काळामध्ये विचार भिन्नता पेक्षा विचार शुन्यता समाजाकरीता माेठे आव्हान असतांना देश, समाजहितासाठी वृत्तपत्र आणि पत्रकारिता संतुलन राखण्याचे कार्य करीत आहे. या विचार प्रवाहाच्या विराेधात पत्रकारिता करीत समाजाला एक सक्षम दिशा देणाऱ्या वृत्तपत्र लाेकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माेलाची भुमिका पार पाडत आहे. आज समाजाला अशाच व्रतस्थ पत्रकारितेची गरज असून जनकल्याणाकरीता लाेकशिक्षण, प्रबाेधन आणि मार्गदर्शन करणाऱ्या वृत्तपत्रांच्या विकासासाठी शासनाचे पाठबळ भक्कमरित्या दिल्या जाईल. प्रामुख्याने लहान वृत्तपत्रांची लाेककल्याणाची भुुमिका पाहता वृत्तपत्र क्षेत्राचा विकास साधण्यावर शासनाचा पुढाकार सकारात्मक राहील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितिनजी गडकरी यांनी व्यक्त केला.

जनकल्याणाकरीता १९५० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या दै. हिंदुस्थान व्रतस्थ पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देत आहे. आज दै. हिंदुुस्थान पत्रकारिता क्षेत्रामध्ये ७५ वर्ष पुर्ण करीत असून शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ राेजी अमृत महाेत्सवाचा शुभारंभ श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील स्व. साेमश्वर पुसतकर सभागृह येथे आयाेजीत साेहळ्याद्वारे करण्यात आला. दै. हिंदुस्थानच्या अमृृत महाेत्सव साेहळ्याला उद्घाटक म्हणून केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित हाेते. प्रमुख उपस्थितीमध्ये माजी राज्यसभा सदस्य व लाेकमत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष विजयबाबू दर्डा, इंडियन न्यूजपेपर साेसायटी, नवी दिल्लीचे अध्यक्ष राकेशजी शर्मा, लाेकमान्य मल्टिस्टेट काे ऑप. साेसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा दै.तरुण भारत बेळगावचे संपादक किरणजी ठाकुर, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, माजी लेडी गव्हर्नर डाॅ. कमलताई गवई, दै. हिंदुस्थानचे संपादक उल्हास मराठे, मार्गदर्शक डाॅॅ. अनंत मराठे, डाॅ. सुरेशराव सावदेकर आदी मान्यवर उपस्थित हाेते.

कार्यक्रमाची सुरूवात दिपप्र्रज्वलन तसेच दै. हिंदुस्थानचे प्रेरणास्त्राेत वीर वामनराव जाेशी, पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन, स्व. राजाभाऊ बारलिंगे, पत्रमहर्षी स्व. बाळासाहेब मराठे, दिवंगत संपादक स्व. डाॅ. अरूण बा. मराठे, दै. हिंदुस्थानचे आधारवड स्व. प्रभाताई अ. मराठे, स्व. नलिनीताई बा. मराठे यांच्या प्रतिमेचे पुजन करीत अमृत महाेत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दै. हिंदुस्थानच्या वतीने व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांची अभ्यासपुर्ण मार्गदर्शन करीत दै. हिंदुस्थानच्या अमृत महाेत्सव वर्षाला शुभेच्छा दिल्यात.

लाेकशाही करीता वृत्तपत्रांचा विकास आवश्यक : राकेश शर्मा

जगातील सर्वात माेठी लाेकशाही असलेल्या व्यवस्थेचा चवथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांची भुमिका माेलाची असते. असे असतांना आज वृत्रपत्रांची अवस्थ बिकट झालेली दिसत आहे. वृत्तपत्राचे उत्पन्नाचे स्त्राेत शासकीय जाहीराती असतांना काेराेना काळापासून शासनाने अनेक शासकीय जाहीराती बंद केल्या आहेत. त्यामुळे दरदिवशी वृत्तपत्रांना अनेक अडचणींचा समान करीता जनकल्याणाचे कार्य करावे लागत आहे. एक सुजाण लाेकनेता म्हणून केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांनी या संदर्भात पुढाकार घेत या पुढे रस्ते वाहतुक आणि महामार्ग विभागांतर्गत जागा संपादन बाबत जाहिराती इंग्लीश वृत्तपत्रासाेबतच केंद्र सरकारच्या शासनमान्य जाहिरात यादीत समाविष्ट असलेल्या जिल्हास्तरीय वृत्तपत्रांना देण्यात येणार असल्याची ग्वाही इंडियन न्यूजपेपर साेसायटी, नवी दिल्लीचे अध्यक्ष राकेशजी शर्मा यांनी दिली.

वृत्तपत्रांना शासकीय पाठबळ आवश्यक : विजयबाबू दर्डा

दै. हिंदुस्थानच्या अमृत महाेत्सवाचा शुभारंभ हाेत असतांना वृत्तपत्रांच्या विकासाची अपेक्षा व्यक्त हाेत आहे. प्रामुख्याने कराेना काळामध्ये वृत्तपत्रांनी स्वत:च्या अस्तीत्वासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. वृत्तपत्राचा विचार करता विकासाकरीता जाहीराती एकमात्र साधन असतांना शासनाने जाहिरातींमध्ये केलेली कपात लाेकशाहीच्या चवथ्या स्तंभाकरीता घातक ठरत आहे. मुळात सर्वसामान्यांना दिशा देणारे लहान, माेठे वृत्तपत्रांची विश्वासहार्यता आजही शाबुत आहे. त्यामुळे सर्व वृत्तपत्रांच्या विकासाकरीता राज्य व केंद्र शासनाचा जाहिरातींच्या माध्यमातून पुढाकार आवश्यक असल्याचे मत लाेकमत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष विजयबाबू दर्डा यांनी व्यक्त केले.

दैै. हिंदुस्थानने पत्रकारीता जपली : किरण ठाकुर

लाेकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांची महती असतांना बदलत्या परिस्थितीचा प्रामुख्याने भांडवलशाहीचा प्रभाव वृत्तपत्रांवर दिसत आहे. याकरीता शासकीय उदासिन धाेरण सुद्धा कारणीभूत आहे. मात्र, अशाची परीस्थितीमध्ये अनेक वृत्तपत्र पत्रकारीतेचे ध्येय जाेपासत आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा गाैरव म्हणुन दै. हिंदुस्थान विचार संस्कृतीद्वारे सकारात्मक पत्रकारीता जाेपासात आहे. आदर्श विचारांचा वारसा जाेपासत दै. हिंदुस्थानने राष्ट्र शक्ती जपली आणि भक्ती जागवली आहे. हेच पत्रकारीतेचे अंतीम ध्येय असून समाजाला, जनसामान्यांना दिशा देण्यासाठी प्रत्येक वृत्तपत्रांनी पत्रकारीता जपावी असे आवाहन लाेकमान्य मल्टिस्टेट काे ऑप. साेसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा दै.तरुण भारत बेळगावचे संपादक किरणजी ठाकुर यांनी करीत दै. हिंदुस्थानच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दै. हिंदुस्थानचे मार्गदर्शक डाॅ. अनंत मराठे यांनी केले.

संचालन डाॅ. वृंदा विवेक मराठे तर आभार सर्वेश विनाेद मराठे यांनी मानले.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तीमत्वांसह माेठ्या संख्येने नागरीक उपस्थित हाेते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. भारतीय राजकारणातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असा ज्यांचा गौरव करण्यात येतो,ते नितीन गडकरी हे देशाच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्य करणारे एक सोज्वळ सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व आहेत.
    दैनिक हिंदुस्थान हे मराठीतील एक आघाडीचे वृत्तपत्र. लोकशाहीचा चौथा स्तंभ,ही संतुलित भूमिका लोकशिक्षण आणि लोकप्रबोधन या माध्यमातून हे वृत्तपत्र करत आहे.हा त्यांचा
    विचार भावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments