Thursday, November 21, 2024
Homeपर्यटनफोटो मागची बातमी : २

फोटो मागची बातमी : २

सहस्त्रकुंड धबधबा

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड (इस्लापूर) येथे असलेला अन् शेकडो वर्षापासून जनतेच्या मनाचा ठाव घेणारा प्रचंड धबधबा म्हणजे सहस्त्रकुंडचा धबधबा. सतत पर्यटकांसाठी आकर्षक असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर इस्लापूर गावापासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर आहे. या धबधब्याचे पाणी साठण्यासाठी एक खोल कुंड असून आज पर्यंत या कुंडाच्या खोलीचा तळाचा अंदाज लागलेला नाही. हे स्थळ विकासाच्या दृष्टिने अजूनही दुर्लक्षीतच आहे.

येथे महादेवाचे मंदिर असुन पंचकोशीतील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. मला ध्वनी आणि पाण्याची जोरदार शक्ती आवडते, मग त्या समुद्राच्या लाटा असो किंवा धबधबा त्यातल्या त्यात लाटांची अनुभुती घ्यायची असली तर भरती आणि आहोटीतील मध्य बिंदु ची वेळ साधता आली तर जी ऊर्जा मिळते ती शब्दातीत आहे. नदी खडक कापते, तिच्या सामर्थ्यामुळे नव्हे तर तिच्या चिकाटीमुळे. अशाच नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड च्या घबधब्याची गाज खुप काही अनुभुती देवुन जाते ती फक्त एकांत, शांतपणे निस्वार्थ भावनेने अनुभवता मात्र आली पाहीजे.

आपल्या पैनगंगेच्या धबधब्यातुन विसर्ग होणारा हा प्रवाह सर्वात परिपूर्ण प्रवासी आहे कारण तो प्रवाहीत असताना जो प्रवास करतो तेव्हा तो स्वतःच मार्ग बनवत पुढे जातो.

पैनगंगा नदीवरील या सहस्त्र कुंड धबधब्याचे वास्तु तज्ञाच्या मते वेगळेच वैशिष्टय आहे. मला एका तज्ञानी नांदेड च्या विश्राम गृहात लावलेला फोटो पाहुन मला सांगितले की हा तुमचा धबधब्याचा काढलेला फोटो अतिशय वैशिष्टय पुर्ण आहे तो असा की पैनगंगा वाहत येत धबधब्यातुन पाणी कोसळते, लगेच कुडांत साठते आणि साठवुन भरलेले पाणी पुन्हा प्रवाहीत होते. आपल्या कडे जिद्द, चिकाटी, मेहनत, परिश्रमातुन येणारी संपंती ही अशीच येत राहो. साठवत राहो. पुढील सत्कार्यासाठी प्रवाहीत होत राहो असाच अर्थ मी त्यांच्या बोलण्यातून काढला.

तसे मला ही धबधबे, पक्षी आणि वाऱ्यांचे गाणे ऐकावे वाटते. मला ही खडकांचा अर्थ लावुन महापुर, वादळ आणि हिमस्खलनाची भाषा शिकण्याची तडफ कायम राहिली आहे. जंगल आणि जंगलाची भाषा काय असते यांची पुसटशी ओळख मारोती चित्तमपल्ली यांच्या सहवासात जाणवली. थोडीशी अनुभवली. त्यातुन एकच शिकायला मिळाले की निसर्गाच्या जवळ जाता आले, काही अनुभवता आले तर, काही कॅमेऱ्याच्या माध्यमातुन टिपता आले असाच प्रत्येक धबधब्यात एक संदेश दडलेला असतो. मग तो आपल्या नांदेड जिल्यातील सहस्स्त्रकुंड माहुरच्या शेखफरीद चा धबधबा असो वा कोकणातील दुधसागर घबधबा असे या सर्व धबधब्याच्या तळाशी एक आशा आहे. म्हणून आपण ही संक्रमण काळात येणाऱ्या अश्रूंबद्दल दुःखी होऊ नका, कारण खडकांना धबधब्याबद्दल कधीही पश्चात्ताप होत नाही. “म्हणूनच आपण ही पाणी आणि निसर्गाची गती स्विकारु या. कारण आपण ही निसर्गाच्या सानिध्यात अद्भुत जगात राहतो जे सौंदर्य, मोहिनी आणि साहसांनी भरलेले आहे. ते उघड्या डोळ्यांनी शोधले तरच आपल्या साहसांना अंत नाही. वाहणारे पाणी कधीच शिळे होत नाही ही कल्पना आहे, म्हणून वाहते रहा आणि म्हणून आपन ही संक्रमण काळात येणाऱ्या अश्रूंबद्दल दुःखी होवु नका. कारण खडकांना धबधब्याबद्दल कधीही पश्चात्ताप होत नाही. आपण ही पाणी आणि निसर्गाची गती स्विकारु या आणि पावसाळ्यात तर धबधबा ओलांडुच नका.

हे ठिकाण घातक आहे. म्हणून नांदेड जिल्हा प्रशासनाने ही पावसाळ्यात अति वेगाने प्रवाहित होनाऱ्या सहस्त्रकुंड धबधध्याच्या परिसरात पर्यटकांनी सतर्क राहुन स्वत:जबाबदारीने काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विजय होकर्णे

— लेखन, छायचित्रण : विजय होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments