Tuesday, September 16, 2025
Homeकलामनस्वी चित्रसाधक : मनीष बोबडे

मनस्वी चित्रसाधक : मनीष बोबडे

आजच्या पिढीतल्या तरुणांना करियरसाठी अनेक पर्याय खुले आहेत. तरीही करियरचा मार्ग निवडतांना प्रत्येकजण महत्त्व देतो ते चटकन नोकरी लागून भरमसाठ पगार मिळवणाऱ्या अभ्यासक्रमांनाच ! पण मनीषनं या सर्वांपेक्षा थोडी वेगळी वाट चोखाळली. ही वाट तशी अवघडच ! वाट होती निरंतर साधनेची, अपार परिश्रमाची ! पण निखळ आनंद देणारी ! तो आनंद होता कलासाधनेचा !

यवतमाळमध्ये राहणार्‍या मनीष बोबडे याला सात-आठ वर्षांचा असतांनाच मूर्तीकलेची आवड जडली. गणपती, नवरात्र, शारदोत्सव या सगळ्या सणांमध्ये मनीषच्या घरी त्याने स्वत: घडवलेल्या मुर्तीचीच पूजा केली जायची. हळूहळू मनीष मूर्तीकलेकडून चित्रकलेकडे आकर्षित होऊ लागला आणि पहाता पहाता त्याच्या हातून अप्रतिम चित्र साकार होऊ लागली.

मनीष बोबडे

मनीषच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यातच त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे घरची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मनीषचं हे चित्रकलेविषयीचं प्रेम आणि त्याची प्रतिभा पाहून घरची परिस्थिती नसतांनाही त्याच्या आईनं, म्हणजे सुरेखाताईंनी हिम्मत एकवटून त्याला चित्रकलेतील उच्च शिक्षणासाठी नागपूरला पाठवलं. नागपूरात आल्यावर मनीषनं चित्रकला महाविद्यालयात बी. एफ. ए. ला प्रवेश घेतला आणि त्याची कला साधना सुरू झाली.

यवतमाळसारख्या ठिकाणाहून नागपूरसारख्या राजधानीच्या शहरात आलेल्या मुलाच्या कानात वारं शिरायला वेळ लागत नाही पण परिस्थितीने मनीषला परिपक्व आणि खंबीर बनविलं होतं. त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न तरळत होती, हातात चित्रकलेची आयुध होती आणि मनात दृढनिश्चयाचं बळ होतं, सोबतीला वाटेल ते परिश्रम करण्याची तयारी होती. याच गुणांच्या भरवशावर यशाच्या वाटेवर त्याची पावलं पडू लागली !

शिक्षण घेत असतांना त्यानं अनेक महाविद्यालयीन स्पर्धांमधून बक्षिसं मिळविली. अनेक कला महोत्सवात त्याच्या चित्रांची प्रदर्शनं भरविण्यात आली आहेत. बी. एफ. ए. नंतर एम. एफ. ए. ची पदवी त्यानं मिळवली. याच दरम्यान आरोही या व्हीएनआयटीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत (२००२) त्याला दुसरा पुरस्कार मिळाला. तसेच उज्जैन इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात (२००६) त्याच्या चित्रासाठी दुसरा पुरस्कार मिळाला. त्या नंतर धनबाद इथे झालेल्या राष्ट्रीय कला कुंभमेळ्यात (२००७) त्याच्या पेंटिगला उत्कृष्ट चित्राचा पुरस्कार मिळाला.

नागपूरमध्ये दरवर्षी राष्ट्रीय पुस्तक मेळा भरतो. नवी दिल्लीच्या पुस्तक मेळा समितीकडून या मेळ्याचं आयोजन केलं जातं. या समितीच्या वतीनं मनीषला कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल “भाऊ समर्थ कला पुरस्कार”(२००८) देण्यात आला..असे विद्यार्थिदशेतच आठ पुरस्कार त्याच्या खाती जमा झाले.

पुण्यात लोकमान्य टिळक कला प्रदर्शनी तसंच नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनात अनेक वेळा विविध चित्रे त्याने प्रदर्शित केली आहेत. याशिवाय त्यानं अनेक ग्रुप शो देखील केले. नवरंग, आरंभ, जॉइनिंग हॅन्डस् ‘अष्टभुजा’, लालित्य या नावानं नागपूरात तर ‘चातक’, ‘मान्सुन शो’, ‘अष्टभुजा’ या नावानं पुण्यात त्याचे पेंटिंग शो झालेले आहेत. आजपर्यंत तो भारतातील अशा ३१ समूह प्रदर्शनात सहभागी झाला आहे. त्यातील उल्लेखनीय म्हणजे ललित कला अकादमी, न्यू दिल्ली, चेन्नई, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई इ. ठिकाणी त्याच्या चित्राची प्रदर्शने भरली आहेत; तर प्रदर्शक आर्ट गॅलरी मुंबईमध्ये दोन वेळा( २०११,१७)आणि चोला मंडल आर्ट गॅलरी, चेन्नई येथे(२०१९)त्याच्या पेंटीगची स्वतंत्र प्रदर्शने भरली आहेत.

महाविद्यालयीन जीवनापासून मनीषच्या यशाची घोडदौड सुरू आहे ती आजतागायत ! ‘लोकसत्ता‘ सारख्या अग्रगण्य दैनिकाने विशेष लेखाद्वारे त्याची दखल घेतली तर ‘आकाशवाणी‘ सारख्या प्रसारमाध्यमाने त्याची मुलाखत घेऊन त्याचा सन्मान केला आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे प्रसिध्दीपत्रक असो की नागपूर विद्यापीठाचे वार्तापत्र असो किंवा आविष्कार सारखा आंतरविद्यापीठीय महोत्सव असो त्यात मनीषच्या कलेची दखल घेतली नाही असं झालं नाही. या सर्वांवरून त्याच्या भविष्यातील स्वप्नपूर्तीचा मार्ग प्रशस्त आहे, असं समजायला हरकत नाही.

“कलाकार हा जन्मालाच यावा लागतो,” असं म्हणतात. तसाच मनीषही जन्मजात कलाकार आहे. त्याचा धडपड्या स्वभाव, कठोर परिश्रमाची तयारी आणि याच्या जोडीला उपजत प्रतिभा यामुळं तो पुढे येतोय. लहान वयात मिळालेल्या प्रसिध्दीनं तो हुरळून गेला नाही. त्या उलट मनीषच्या अंगी असलेली नम्रता आणि निरागस वृत्ती या त्याच्या स्वभावानं तो सर्वांना आपलंस करतो.

एक मोठा, नामवंत कलाकार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मनीषची अविरत वाटचाल सुरू आहे अन् त्यासाठी कठोर साधना करण्याची त्याची तयारीही आहे.

नुकताच त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. ऑल इंडिया आर्टस्  ऍन्ड क्राफ्ट सोसायटीच्या नवी दिल्ली येथे भरलेल्या ९२ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात त्याच्या चित्राला २५००० रु चा प्रथम पुरस्कार मिळाला. संस्थेचे अध्यक्ष आणि शिल्पकलेतील भीष्मपितामह श्री राम सुतार यांच्या हस्ते त्याला तो बहाल करण्यात आला.

आजपर्यंत भारतभरातील विविध ठिकाणच्या नऊ कार्यशाळेत सहभाग नोंदवून तेथे त्यानेआपली कला प्रात्यक्षिकासह सादर केली आहे. त्याची देखणी चित्रे
भारताच्या सीमा ओलांडून युरोप अमेरिका इ.देशातील चित्ररसिकांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत !

दिगंत कीर्तीसाठी अन् उज्ज्वल भवितव्यासाठी चित्रसाधक मनीष विजयकुमार बोबडे याला अनेकानेक शुभेच्छा !

डॉ. स्मिता होटे

– लेखन : डाॅ स्मिता होटे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. Sign in
    SIGN IN
    Welcome!Log into your account
    your username
    your password
    Forgot your password?
    PASSWORD RECOVERY
    Recover your password
    your email

    Home कला
    कला
    मनस्वी चित्रसाधक : मनीष बोबडे
    By NST Team -June 18, 20211226

    Previous article
    एका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण
    Next article
    बियॉन्ड सेक्स

    NST Team
    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    कला
    ओठावरचं गाणं

    कला
    मानसीची चित्रकार : शिल्पा निकम

    कला
    छायाचित्रकाराच्या दृष्टीतून दृष्टीदाता डॉ तात्याराव लहाने
    1 COMMENT
    Pratibha Saraph
    June 18, 2021 at 5:25 pm
    “कलाकार हा जन्मालाच यावा लागतो,” हे खरं आहे चित्रसाधक मनीष अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
    प्रतिभा सराफ

    Reply
    प्रवीण पांडे
    June 18, 2021 at 7:44 pm
    Your comment is awaiting moderation
    मनीष ला मी बालपणापासून ओळखतो,बालपणीच पितृछत्र हरविलेला मनीष,या जगात आपली ओळख निर्माण करण्यासाठी अक्षरशः झगडला..आणि समाजानेही त्याला दाद दिली…मनीष stay blessed always… तू आणखीन पुढे जा,आम्ही सोबत आहोतच..

    Reply
    LEAVE A REPLY
    Comment:
    प्रवीण पांडे
    prampande@gmail.com
    Website:
    Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

    सर्वाधिक वाचलेले

    लग्न लग्न म्हणजे काय हो..
    May 18, 2021

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सामाजिक समतेत अमुल्य योगदान
    May 28, 2021

    असे कसे हे दिवस आले म्हणावे?
    April 20, 2021

    मुंगसे
    May 22, 2021
    Load more
    जुने पण महत्वपूर्ण

    यशकथा
    नेदरलँड्सची प्रणिता

    लेख
    करोना आणि महिलांचे विश्व

    साहित्य
    शिक्षणवाटा चोखाळताना : एक मनस्वी मनोगत

    बातम्या
    मुंबई महानगर क्षेत्रात वाढीव बिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांकडे बैठक
    Our Team

    NST Team
    286 POSTS0 COMMENTS

    Devendra Bhujbal
    94 POSTS67 COMMENTS
    https://newsstorytoday.com

    Reporter
    28 POSTS0 COMMENTS

    Staff Writer
    9 POSTS0 COMMENTS

    Devashri Bhujbal
    7 POSTS0 COMMENTS
    http://www.newsstorytoday.com

    Alka Bhujbal
    5 POSTS0 COMMENTS

    ABOUT US
    NewsStoryToday is a website bringing you news updates, features and success stories around the world. Stay tuned to our WhatsApp, Facebook groups to get latest content. Your responses are most welcome.Please contact us for content contribution and advertisement.
    Contact us: alka.bhujbal1964@gmail.com
    FOLLOW US

    Disclaimer Privacy Advertisement Contact Us
    © NewsStoryToday

  2. मनीष ला मी बालपणापासून ओळखतो,बालपणीच पितृछत्र हरविलेला मनीष,या जगात आपली ओळख निर्माण करण्यासाठी अक्षरशः झगडला..आणि समाजानेही त्याला दाद दिली…मनीष stay blessed always… तू आणखीन पुढे जा,आम्ही सोबत आहोतच..

  3. “कलाकार हा जन्मालाच यावा लागतो,” हे खरं आहे चित्रसाधक मनीष अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
    प्रतिभा सराफ

  4. अप्रतिम आणि अद्भुत अशा कलागुणांनी परिपूर्ण तसेच वैचारिक पातळीवरील चित्रकला ची शैली अंगीकृत असणे असणे आणि करणे यामध्ये फार फरक असतो.
    श्री. मनीष बोबडे सरांना मी एक वेळ असच मित्रांच्या सोबत असताना आमच्या साहित्यिक आणि कला क्षेत्रातील नवनवीन चेहरे आणि त्यांची कला याबाबत चर्चा रंगली असताना त्यांनी काढलेले काही चित्र मला बघायला मिळाले होते, सुरुवातीला मला वाटल कि पेंटिंग सारखी पेंटिंग आहे पण जेव्हा मी त्यांना निरखूण बघण्यास सुरुवात केली असता, मला श्री. मनीष सरांची अजून फोटोस बघण्याची इच्छा झाली…

    असाच मी त्यांना एक कॉल केला फक्त सांगण्या करिता कि सर आपली पेंटिंगची कला अप्रतिम आहे..
    मला आपल्या पेंटिंग्स खूप आवडतात व आपण काढलेल्या चित्रांमध्ये मला जिवंतपणा जाणवला…

    तुमचा दृष्टिकोन आणि विचार हे जगाच्या पाठीवर नवशिक्या तरुण मंडळीसाठी प्रेरणादायक आहे. मला पेंटिंग चा प देखील येत नाही पण एक छंद म्हणून मी थोडा फार लिखाण करण्याची सवय आहे.

    श्री. मनीष बोबडे सरांसोबत बोलत असताना मला त्यांनी मला मी कोणी दुसरा तिराईत व्यक्ती नसल्यागत वेळ दिला आणि बोलले मला विचार च पडला कि एवढं मोठ व्यक्तिमत्व आपल्या सोबत तब्बल दहा मिनिटे दिलीत…

    बोलताना मला कळालं कि सराना त्यांच्याअंगी एवढी मोठी कला अवगत असताना देखील त्याबद्दल घमंड ज्याला म्हणतो आपण ते 1% सुद्धा नाही…त्यांच्यात प्रेमळ आणि सोज्वळ खरेपणा टिकून आहे.आणि बोलण्यात विनम्रता यामुळे त्यांच्या सारखे व्यक्ती मला दुसरे कदाचितच बघण्यासाठी मिळेल असे मला वाटते.

    “शब्द हे माझ्या मनाचं आहे, मी फक्त त्याचे लिखाण केले एवढंच मी म्हणू शकतो आणि परत एकदा देवाचरणी प्रार्थना करतो कि यशवंत होवो आणि अशीच प्रगती करत राहो..श्री. मनीष बोबडे सराना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे लिखाण इथेच थांबवतो..”
    “धन्यवाद”
    सारंग बोर्डे ( कारंजा लाड )
    9922362682

  5. Art is neither a profession nor a hobby. Art is a way of being and a way of life.
    Great piece of art @ManishBobade. I appreciate the details and specifics of all paintings in this article.
    It’s eloquent! Great Article 👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ओझोन ओझोन….

हलकं फुलकं

झेप : ३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments