आकाशी घन गहिरा आवेगा सावरतो
साधत क्षण मोक्याचा सृष्टीवर ओघळतो
पान नवे फूल नवे गंध मनी दरवळतो
ओठावर गीत खुले मनमयूर मोहरतो
हलगीच्या तालावर नाद नवा दुमदुमतो
छंद जुना बहर नवा ढोल पुन्हा ढमढमतो
भाद्रपदी शुक्ल पक्ष चतुर्थीस क्षण येतो
प्रेमाने भेटाया लंबोदर अवतरतो
भक्तांच्या ह्रदयातुन लाट उठे हर्षाची
पूर्ण जणु उत्कंठा आज पुर्या वर्षाची
आवडते खाद्य तुला एक जुडी दुर्वांची
सारणही मोदाचे पारी पण भक्तीची !
— रचना : प्रा.डाॅ.आनंद महाजन. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान रंग, गंध नाद स्वाद युक्त कविता