व्यवसायाने अभिनेत्री, लेखिका असलेल्या पुणे येथील सोनल गोडबोले यांनी ऑगस्ट २०२० मधे बियॉन्ड सेक्स या त्यांच्या कादंबरीचे प्रकाशन केले. या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीच्या अल्पावधीतच तीन आवृत्त्या संपल्या. लवकरच ही कादंबरी सहा भाषेत येतेय.
वाचकानी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानतर लेखिका सोनल गोडबोले या आता “मेकिंग ऑफ बियॉन्ड सेक्स” हे अभिनव पुस्तक तयार करत आहेत. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी या आधी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. पण एखाद्या गाजलेल्या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी तयार होणारे बहुधा हे मराठीतील पहिलेच पुस्तक असावं. विशेष म्हणजे या प्रक्रियेत वाचकांना देखील सहभागी करून घेण्याचा लेखिकेचा मानस आहे.
त्यामुळे ज्यानी, ही कादंबरी वाचलीय आणि ज्यांना, त्यांचे कादंबरीबद्दलचे अभिप्राय त्यांच्या नावासकट छापून यावे असं वाटतय त्यांनी ८६०५६९७१६१ या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सएपद्वारे १० जुलै २०२१ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.