रानात गाठतील
झोपडीत भेटतील
मतदार दिसताच
मेल्यालं उठतील
ऊर पिटतील
पाय चाटतील
अल्लाघरची
गाय वाटतील
थैल्या सुटतील
गठ्ठे तुटतील
सौदे पटतील
मतं फुटतील
आमदार फुटतील
नामदार फुटतील
किल्यावानी
गावं फुटतील
शपथा तुटतील
निष्ठा फाटतील
आपण आपलं बघत बसा
बनेल बोके खुर्च्या गाठतील
— रचना : साहेबराव ठाणगे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

कविवर्य साहेबराव विलेक्शन फुटाफुटी ही आपली रचना अतिशय सुंदर 👌 👌
आपले मनःपूर्वक अभिनंदन सर