वापटी गावची ही बहिर्जी शाळा
मला घडविणारा गुरूंचा मळा
टेकाळे सर मुख्याध्यापक असे
इंग्रजी वाघाला बनविले ससे
थोरात गुरूजींचा मराठी लळा
सुंदर सुविचार सजला फळा
आकोशकर सरांची हिंदी भारी
कुलकर्णी सरांची ज्ञान तयारी
सुरूशे सरांची कवायत कला
मैदान सजले राष्ट्रीय सणाला
भोसले सरांचा इतिहास डोळा
शफीत शोधला मुस्लिम मावळा
बेंडके गुरूजींची सुत्र गणिती
रावजी गुरूजींची मित्र भूमिती
चेके गुरूजींची सदा धावपळ
जानीचं हो भलं मनी तळमळ
मोरे गुरुजींचा संघर्ष अटळ
कमी दृष्टीत अफाट बुध्दीबळ
नबीसाबाच्या हे अधिपत्याखाली
गेले आजोबा झाली काॅलनी खाली
— रचना : शेख शफी बोल्डेकर. कळमनुरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
।। सुंदर काव्यरचना ,गुरूंचा महिमा ।।