“श्रवण दोष बाधित बालक”
फेसबुक वर एक खूप वायरल झालेली पोस्ट नुकतीच बघितली.एक रीळ होती त्यात एक आई आपल्या साधारण एक ते दोन वर्षाच्या झोपलेल्या बाळाला कडेवर घेऊन त्याची मान आपल्या खांद्यावर आणि गळ्याशी घेऊन खूप मोठा ढोल जोर जोरात वाजवत होती. बाळ झोपलं होतं असं दिसत होतं. रीळ मध्ये एकूणच ढोल आणि इतर वाद्यांचा खूप मोठा आवाज येत होता. आईचे ढोल वाजवताना हलणारे खांदे बाळाची मान, डोकं पण हलवत होते. प्रचंड आवाज होता तरी ते बाळ झोपलेलं होतं. अर्थात त्याला किती झोप येत असणार याचा अंदाज येतो. कमेंट्स वाचायची उत्सुकता झाली म्हणून कमेंट्स वाचू लागले. तर त्या आईला कोणी “झाशी ची राणी” संबोधले होते तर कोणी या आईला आपल्या “बाळाची काहीच काळजी नाहीय” असं पण आपलं मत मांडलं होतं. मिश्र विचारांच्या लोकांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. नंतर त्या रीळ ची तक्रार पण झाली.
आज आपल्याशी एक वेगळा विषय बोलायचा आहे. बालकांना आज सर्रास आपण मोबाईल वापरताना बघतोय. headphones तर कानाचाच एक भाग होऊन गेला आहे. बालकांमध्ये headphones वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना काळात बालकांना याची जास्त सवय लागली.
सर्वत्र ध्वनी प्रदुषण वाढलेलं आहेच. याचा सगळ्यांनाच त्रास तर होतोच आहे आणि श्रवण शक्तीवर होणारा दुष्परिणाम याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे श्रवण दोष बालकामध्ये बघायला मिळत आहेत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अहवाला नुसार. 10-6 वयोगटातील 19 पैकी एक व्यक्ती हेडफोन, रॉक कॉन्सर्ट, स्टिरिओ, नाईट क्लब आणि डिस्कोमधील मोठ्या आवाजातील संगीतामुळे कायमस्वरूपी श्रवणक्षमतेने ग्रस्त आहे.
याबाबत पुण्यातील प्रख्यात ENT सर्जन, माझे पती, डॉ दुष्यंत खेडीकर यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, “भारतात 63 दशलक्ष कर्णबधिर आहे. श्रवणशक्ती अक्षम करणे म्हणजे प्रौढांमधील चांगल्या ऐकण्याच्या कानात 40 डेसिबल (dB) पेक्षा जास्त श्रवणशक्ती कमी होणे आणि लहान मुलांच्या चांगल्या ऐकण्याच्या कानात 30 dB पेक्षा जास्त श्रवण कमी होणे.
ज्या व्यक्तीला ऐकू येत नाही तसेच सामान्य ऐकू येत नाही – 25 dB किंवा दोन्ही कानात त्याहून चांगले ऐकू येत असलेल्या व्यक्तीला – ऐकू येत नाही असे म्हटले जाते.श्रवण कमी होणे सौम्य, मध्यम, गंभीर किंवा गहन असू शकते. त्याचा एका कानावर किंवा दोन्ही कानांवर परिणाम होऊ शकतो आणि संभाषणात्मक बोलणे किंवा मोठ्याने आवाज ऐकण्यात अडचण येते. या विषयावर जनजागरण होण्यासाठी दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिवस साजरा केला जातो.”
जगातील 466 दशलक्ष लोक श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे कमी जगतात. हे जगाच्या लोकसंख्येच्या 5% पेक्षा जास्त आहे. त्यात ४३२ दशलक्ष प्रौढ आणि ३४ दशलक्ष मुलांचा समावेश आहे.3.60% बालपणातील श्रवणशक्ती कमी होण्याजोगी कारणांमुळे होते.1.1 अब्ज तरुणांना (12-35 वर्षे वयोगटातील) मनोरंजनाच्या सेटिंग्जमध्ये आवाजाच्या संपर्कात आल्याने श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे. अशी माहिती आपल्याला वाचायला मिळते आणि डॉक्टरांशी चर्चा केल्या नंतर बालकांमध्ये वाढणारे कर्ण दोष आणि त्याची गंभीरता याची माहिती मिळाली. ही माहिती पालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लहान बालकामध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगली असते. परंतु अनेक कारणांमुळे कानावर होणारे दुष्परिणाम दीर्घकालीन असतात याची शक्यता नाकारता येत नाही.
तरुणांमध्ये sudden hearing loss चे प्रमाण वाढत आहे असे डॉ खेडीकर यांनी सांगितलं. बालकांमध्ये पण हे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते यासाठी पालकांनी बालकांची काळजी घेणं आवश्यक आहे. ध्वनी प्रदुषणापासून बालकांना वाचवणं गरजेचं आहे. असं त्यांचं मत आहे.
एका अत्यंत गरीब कुटुंबातील बालिका जिला कर्ण दोष होता आणि त्या कारणाने ती नीट बोलू शकत नव्हती, नीट ऐकू येत नसल्यामुळे शाळेत अभ्यासात तिला अडचणी येत होत्या. या बालिकेला डॉक्टरांनी कर्णयंत्र दिलं. कर्णयंत्र वापरल्या नंतर तिने पहिल्यांदा पक्ष्यांचे आवाज एकले आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. कोकिळा गाते हे तिला त्यादिवशी कळलं. या सगळ्या पक्षाकडे इतके मधुर स्वर आहेत हे ती त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवत होती. कर्णयंत्रामुळे तिची बधीर दुनिया नव्या सूरांनी सजली होती. कर्ण दोष लवकर लक्षात आला असता आणि तिला लवकर कर्ण यंत्र मिळालं असते तर तिने वेळीच प्रगती केली असती. बोलण्यातील अडचणी speech therapy च्या मदतीने लवकर दूर झाल्या असत्या. त्यासाठी पालकांनी जागरूक असणं बालकांच्या आरोग्याच्या समस्येकडे लक्ष देणं आणि सगळ्यात महत्वाचं. बालकास श्रवण दोषाचा त्रास आहे याचा स्वीकार करणं आणि त्याचे उपचार होऊ शकतात यासाठी डॉक्टरांची मदत घेऊन बालकाच्या अडचणी सोडवणयासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
Noise induced hearing loss is a well-known in between adults.However , it’s impact in Children is not very stupid. There are certain studies conducted across various countries like America.
Canada Olympics, British China and Australia.Most of these studies indicate that the prevalence of noise induced hearing loss in children less than 14 years ranges from ranges from 12% to 20%. The predominant causes of noise induced hearing loss increased Users of personal entertainment devices, Rock concerts, Watching television loud Volume.
Key environmental exposure to loud noise, including the topic for road Traffic noise, T. V., या सगळ्यांमुळे आपल्याला लक्षात येते बालकांच्या श्रवण क्षमतेवर नकारात्मक परिणाम करणारे घटक कोणते आहेत. पालकांनी आपल्या बालकांचा या ध्वनी प्रदूषण पासून बचाव करायला हवा तसेच बालकांच्या श्रावण क्षमते बाबत दोष आढल्ल्यास कर्ण दोष तपासणी करून Audiologist आणि ENT तज्ञ यांच्या सल्ल्याने उपचार, सर्जरी तसेच गरज असल्यास कर्णयंत्र बसवून घेण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे.
डॉ. खेडीकर यांचे मत आहे की, बालवाडी, शाळा इथे बालकांच्या कर्ण दोषाचां Baseline Study अभ्यास व्हायला हवा. कधी कधी कमी प्रमाणात असलेले कर्ण दोष ओळखणे लवकर शक्य होत नाही. अशी तपासणी झाली तर ते कर्ण दोष शोधणं कठीण होणार नाही आणि वेळीच बालकांवर उपचार होईल. ते लवकरच अशी तपासणी शाळांमधून होईल याचा प्रयत्न करणार आहेत. कर्ण दोषाबाबत सविस्तर माहिती आणि तपासणी शिबिर ते आयोजित करणार आहेत त्याचा पालक व बालकांना निश्चितच फायदा होईल.
आपण सगळे मिळून बालकांची काळजी घेऊ या आणि याबाबत आणखी माहिती मिळवत राहु, जागरूकता निर्माण करत राहू जेणे करून बालकांच्या श्रवण दोष अडचणी आपण सोडवू शकू आणि त्यांचा बधीर झालेला, खोळंबलेला प्रवास आपण सुरळीत करू शकू.
क्रमशः
— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800