Thursday, November 21, 2024
Homeयशकथाअमेरिकेतील नवदुर्गा : ९

अमेरिकेतील नवदुर्गा : ९

नमस्कार मंडळी.

“अमेरिकेतील नवदुर्गा” या लेखमालेतील शेवटचा भाग आज प्रसिद्ध होत आहे. साधारण दोन आठवड्यांपूर्वी चित्रा मेहेंदळे मॅडम नी ज्या वेळी या लेखमालेची कल्पना मांडली, त्यावेळी मी, या लेखमालेचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन उस्फूर्तपणे त्यांना हो म्हणालो.
पण खरंच रोजच्या रोज लेखमाला प्रसिद्ध होत जाईल का ? अशी शंका ही मनात निर्माण झाली. त्याचं कारण म्हणजे साप्ताहिक लेखमाला लिहायला एका आठवड्याचा कालावधी मिळत असतो. पण तेच दररोज लेखमाला लिहायची म्हणजे वेळेशी खूप स्पर्धा करावी लागते. त्यात ही लेख माला काल्पनिक विषयाशी संबंधित, आठवणींवर आधारीत असेल तर लिहिणं सोपं असतं. पण इथे दुसऱ्या व्यक्तींची मुलाखत घेऊन, त्यांच्या कडून आवश्यक ती माहिती घेऊन, मोजून मापून, नेमक्या शब्दात त्या व्यक्तीचं जीवन चरित्र उभं करायचं हे एक दिव्य असतं. पण मेहेंदळे मॅडम नी त्यांच्या, या नवदुर्गांच्या वेळा जमवून, आटोपशीरपणे, अखंडितपणे लेखन केलं या बद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडच आहे. तसंच त्यांना आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून दिल्या बद्दल सर्व नवदुर्गांचे मनःपूर्वक आभार. या लेखमालेतून सर्व नवंदुर्गांचे कौतुक झाले, ही एक प्रमुख बाब असली तरीही त्या करीत असलेलं कार्य, राबवित असलेले उपक्रम इतरत्र सुरू करण्याची प्रेरणा केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरातील नवदुर्गाना मिळून “महाराष्ट्र धर्म तितुका मिळवूया” ही उक्ती सार्थ ठरवू या.
आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

पूर्वल घाटे”

मला फेसबूक वर एक गोड चेहरा, नेहमी दिसायचा ! फॅशन शो मध्ये … मॅाडेल म्हणून !

“फॅशन शो“ बद्दल मला काहीच माहिती नाही, अनेकांनाही नसेल. हे जग किती वेगळे व कसे असते, त्यातले अनुभव कसे असतात ह्याची मला खूप उत्सुकता होती. म्हणून मी त्या मॅाडेललाच त्याबद्दल विचारायचे ठरवले. एका वेगळ्या क्षेत्रातली ही नवदुर्गाच वाटली मला ! तीच ही पूर्वल घाटे.

पूर्वल मुळची पुण्याची. कॅाम्प्युटर सायन्स इंजिनियर होऊन, दोन वर्ष इन्फोसिस मध्ये काम करून, मास्टर्स करायला अमेरिकेतील बफेलो ला आली आणि आता Cardinal Health नावाच्या कंपनीमध्ये Data Governance Manager म्हणून जॉब करते. या कंपनीमध्ये आणि Columbus Ohio मध्ये रहाते.

मुलं थोडी मोठी झाली की थोडा निवांतपणा येतो, एक रूटीन चालू होते. कधी कधी सर्वांनाच मग या रूटीन पेक्षा काही तरी वेगळं, चेंज म्हणून करावं असं वाटतं. पूर्वललाही तसेच वाटले. चार वर्षे ती हिंदुस्थानी क्लासिकल गाणं शिकते आहे. योग शिकून स्वतः च्या फिटनेस कडे लक्ष देते आहे.

2022 मध्ये पुर्वल ला एका मैत्रिणीकडून कोलंबसच्या एका डिझायनर बद्दल कळलं, जी स्वतःचे कपडे डिझाईन करून न्यूयॉर्क फॅशन विक मध्ये तिचं कलेक्शन सादर करणार आहे. तिला सर्व तपशील विचारून, पूर्वलने तिच्या शो मध्ये भाग घ्यायचा असं ठरवलं. कॉलेजमध्ये असताना ती थोडीशी लाजाळू, थोडी अंतर्मुख अशी होती. कधी नाटकांमध्ये म्हणा, नृत्यामध्ये म्हणा, तिनं भाग घेतला नाही. जेव्हा ही फॅशन शो ची संधी आली तेव्हा मात्र तिने ठरवलं की हे एकदा तरी ट्राय करायचं. या शो साठी तिला स्वतः रजिस्ट्रेशन फी भरावी लागली आणि शिवाय फ्लाईट आणि हॉटेलचे पैसे स्वतःचे भरावे लागले. हे सगळं तिच्यासाठी खूपच नवीन होतं, पण हळूहळू तसं ती अजून लोकांना भेटली. या क्षेत्रात तिला कळलं की बरेच मॉडेल्स स्वतःच्या पैशांनी भाग घेतात.

न्यूयॉर्क फॅशन विक फारच भव्य असतो, मोठे स्टेज आणि भरपूर कॅमेरे !. तिला सुदैवाने एक सुंदर साडी म्हणून आऊटफीट मिळाली आणि तिचा न्यूयॉर्क फॅशन शो झाला तेव्हा तिला स्वतःबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास आला. पण असं किती वेळा पैसे भरून मॉडलिंग करायचे ? हे तिचे फुल टाईम करिअर नसले तरी का करायचे ? त्यामुळे मग ती कोलंबस मध्ये थोडं नेटवर्किंग करायला लागली. तिथल्या एका लोकल ब्युटीक मधून, फोटोशूट करण्यासाठी तिने एक ड्रेस रेंटवर घेतला. एका फोटोग्राफर ला इंस्टाग्रामवरनं शोधलं आणि त्याला म्हटलं की ‘collab’ करण्यासाठी !
Collab म्हणजे काय ते मला काही कळलं नाही. तेव्हा पूर्वल नी सांगितलं, “एक फोटोग्राफर, एक मेकअप आर्टिस्ट, एक मॅाडेल, आणि एक डिझायनर एकत्र येतात आणि फोटोशूट करतात. कोणी कोणाला पैसे देत नाहीत. काढलेले सर्व फोटो, व्हिडिओ इन्टाग्राम वर टाकले जातात. यामुळे चौघांची ही पब्लिसीटी होते.“

हळूहळू कोलंबस मध्ये इंडियन डिझायनर्स, फोटोग्राफर्स, यांच्याशी पूर्वल ची ओळख व्हायला लागली. 2023 तिला एक ‘Mrs India Ohio’ नावाच्या पजेंट मध्ये भाग घ्यायची संधी मिळाली. पहिल्या राऊड मध्ये तिला स्वतःबद्दल माहिती सांगायची होती, दुसऱ्या राऊड मध्ये फक्त वॉक करायचं होतं आणि तिसऱ्या राऊडला जजेस कडून एका प्रश्नचे उत्तर द्यायचं होतं. त्याच्यामध्ये ती first runner up झाली आणि तिथून तिचे भरपूर इंस्टाग्राम वर कॉन्टॅक्ट वाढले.

कोलंबस मध्ये एक मोठा फॅशन शो होतो दरवर्षी, ज्याचं नाव आहे “फॅशन विक कोलंबस”. त्याची एक कार्य पद्धती असते आणि त्यानंतर मॉडेल ची निवड करण्यात येते. मग त्याच्यासाठी तिने ऑडिशन दिलं आणि एका भारतीय डिझायनर साठी ती सिलेक्ट झाली. तो पण एक मोठ्या स्तरावर शो होतो आणि त्याच्यामध्ये भाग घ्यायला तिला मिळाला. आता तिला बऱ्याच वेळा काही लोकल बिजनेसेस बोलवतात collab करायला की त्यांच्यासाठी मॉडेल करायला, त्यांच्याबरोबर फोटोशूट करायला आणि जेव्हा संधी मिळते की कुठे ऑडिशन होत आहेत, मॉडेल कास्टिंग, मग ती मॉडेल कास्टिंग साठी अर्ज करते आणि मग ऑडिशन देऊन किंवा फोटो सबमिट करून सिलेक्शन कळवण्यात येते. एखाद्या शो साठी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा ते मॉडेल ला फिटिंगला बोलवतात. तेव्हा आऊटफिट घालून कसा फिट होतोय ते बघतात आणि काही ऍडजस्ट करायला लागला तर ते करतात. मग त्यानंतर एक किंवा दोन प्रॅक्टिस सेशन्स होतात आणि मग शो च्या दिवशी चार ते पाच तास आधी कॉल टाईम असतो आणि मग हेअर मेकअप करून एक फायनल प्रॅक्टिस असते ज्याच्या नंतर शो सुरु होतो. या सगळ्या तयारीलाच खूप जास्त वेळ लागतो पण स्टेज वरती चालायला अर्धा ते एक मिनिट मिळतो. तो अर्धा ते एक मिनिट सगळ्यात जास्त exciting असतो. जेवढा मोठा शो तेवढे जास्त फोटोग्राफर्स असतात आणि मग त्यांना पण भरपूर वेळ लागतो सगळे फोटो एडिट करून पाठवायला. सगळ्या शोज् चे फोटोज् आणि प्रसिद्धी सोशल मीडियावर होते. फेसबुक आणि इंस्टाग्राम वर त्याचे पोस्ट होते.

सुदैवाने ज्या डिझायनर्स बरोबर आत्तापर्यंत तिनं काम केलंय, नेहमीच त्यांच्याबरोबर थोडीफार flexibility तिला मिळाली आहे. ते जे आऊटफिट्स डिझाईन करतात आणि तिला देतात, त्याच्यामध्ये तिला थोडा चॉईस मिळतो की जर तिला एखादा outfit uncomfortable वाटत असेल तर ते बदलून दुसरा देतात. Generally हे अमेरिकन डिझायनर्स बरोबर काम करताना थोडा जास्त प्रॉब्लेम येतो की त्यांचे आऊट फिट आपल्यासाठी थोडे अनकॉम्फर्टेबल असू शकतात आणि जेव्हा असं होतं तेव्हा ती त्यांना सांगते, कशामुळे तिला uncomfortable वाटतय ! त्याप्रमाणे ते बदल करून देऊ शकतात. एखाद दोन वेळा झाले की त्यांना आऊटफिट बदलता आला नाही आणि मग पूर्वलने त्यांना नकार दिला आणि ती तो शो, नाही करू शकली. आऊटफिट सोबत नेता येत नसेल तर ती त्या शो च्या बाहेर पडू शकते. generally सगळे डिझायनर्स flexible असतात. तिला भारतीय किंवा दक्षिण आशियायी डिझाईन्स सगळ्यात जास्त आवडतात आणि भारतीय दक्षिण आशियायी शो मध्ये भाग घ्यायला सगळ्यात जास्त आवडते.

पूर्वल ने आतापर्यंत १२/१३ मॉडलिंग शोज आणि ७/८ फोटो शूटिंग केले आहेत. त्यामध्ये पहिला न्यूयॉर्क फॅशन शो सोडला तर तिला स्वतःहून कधी पैसे भरायला लागले नाहीत.

पूर्वल आपला अनुभव सांगताना म्हणाली, “मॉडेलिंग करत असताना मला दोन गोष्टी लक्षात आल्या आहेत. एक तर मी जेवढ्या मुलींना, बायकांना भेटले या इव्हेंट्स मध्ये, मला असं लक्षात आलं की इथे बायका एकमेकांना खूप सपोर्ट करतात. एकमेकांना एनकरेज करणे, एकमेकांना प्रमोट करणे हे मी खूप बघते. काही लोकल बिजनेस आहेत जे बायका चालवतात आणि जर माझ्या मॉडलिंग मधनं त्यांना त्यांच्या बिझनेस ला मदत होते तर मला खूप आनंद होतो. ‘Women supporting women’ आजकाल खूप ऐकण्यात येते पण मला त्याचा अगदी जवळून अनुभव आला. या फिल्डमध्ये विशेषत: की जिथे बायका एकमेकांचे काम प्रमोट करतात, एकमेकांच्या प्रगतीने खुश होतात. दुसरी गोष्ट अशी मी बघितली की मॉडेलिंग म्हणजे आपल्या बऱ्याच जणांचे मत असतं की मॉडेल एकाच अशा प्रकारच्या बारीक आणि सुंदर अशा दिसल्या पाहिजेत किंवा असतात. पण मी जेवढं शोजमध्ये भाग घेतला तितके मला लक्षात आले की ‘Models can be any size, color and ethnicity’ . या फिल्डमध्ये भरपूर ‘Diversity and Inclusion’ आहे. मॉडल्स वेगवेगळ्या size, color and ethnicity च्या असतात. बारीकच मॉडेल असली पाहिजे आणि गोरीच असली पाहिजे असा हा गैरसमज माझा दूर झाला. एखादा जण जाड आहे म्हणून मॉडल होऊ शकत नाही असे अजिबातच नाहीये. जर तुमच्यामध्ये तो अटीट्युड आणि कॉन्फिडन्स असेल की तुम्ही तो आउटपुट स्टेजवर कॉन्फिडंटली carry करू शकता तर ‘You can be an amazing model’.

मॉडेल ट्रेनिंग आणि grooming साठी अनेक प्रोग्राम्स असतात. प्रत्येक साईज साठी विशिष्ट प्रकारचे आऊटफिट्स डिझायनर कडे असतात. हळूहळू अजून Inclusion वाढतंय. मोठे मोठे शोज बघितले जे Paris Fashion Week, India Couture Week सगळीकडे भरपूर inclusion बघायला मिळतं. मी बऱ्याच वेळा विचार केला की ह्याचं उत्तर फक्त मजा येते म्हणून करते असं नाही, कारण त्याच्यामध्ये मेहनत पण भरपूर आहे. आधी अशा संधी शोधायच्या व त्यांना कॉन्टॅक्ट करायचा, ऑडिशन करायचे, फिटिंग ला जायचं, प्रॅक्टिस करायची, शोच्या दिवशी जायचं, असं सरळ सोपं तर नक्कीच नाहीये. पण जेव्हा मी एखादा इव्हेंट करते मला भरपूर नवीन लोक भेटतात, नवीन अनुभव मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल माझा कॉन्फिडन्स वाढतो. प्रत्येक शो, प्रत्येक फोटोशूट, वेगळा असतो. प्रत्येक वेळी अपेक्षा वेगळा असतात आणि प्रत्येक शो नंतर स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स येतो की आपण काहीतरी नवीन केलं. म्हणून नुसती मजा येते म्हणून हे साईड करिअर नाही तर हा माझ्या overall growth चा भाग आहे. जसा माझ्या जॉब मध्ये मी दरवर्षी नवीन उद्दिष्टे ठरवते, मुलांच्या बाबतीतही कोणत्या activities वर लक्ष द्यायचं किंवा इथे जास्त वेळ घालवायचा आहे, तसेच मॉडलिंग हे माझं एक personal growth चा goal आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मी स्वतःला खूप grow झालेला बघितलं, खूप कॉन्फिडंट बघितले. मी नवीन लोकांना reach out करायला, नवीन लोकांची बोलायला घाबरत नाही, नवीन काहीही म्हटलं की प्रश्न विचारायला विचकत नाही आणि या experiences मुळे मला स्वतः खूप enriched वाटतं. Luckily मला काही आतापर्यंत वाईट अनुभव असे आलेले नाहीत. या सगळ्या गोष्टींना वेळ काढायला लागतो आणि फॅमिली आणि फ्रेंड्स ची बरीच मदत लागते. मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या फॅमिलीने मला या सगळ्यांमध्ये खूप सपोर्ट केलाय.“

खरंच पूर्वल ने सर्व नवदुर्गाना एक नवी दिशा दाखवली आहे, हे निश्चित. तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
समाप्त.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. एका सुंदर मेहनती स्त्रीवरील, अतिशय सुंदर लेख.
    पूर्वल आणि तिचे माहेर- सासरचे कुटुंबीय, सर्वच जण अत्यंत सुशिक्षित, सुशील, प्रेमळ आहेत.
    त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…..
    नाना व लता दिवाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments