सुखालाही असतात पंख
उंच उडून गगनभरारी घेण्यासाठी
कधी ते उडतात सैरभैर
मनसोक्त आकाशात
अन थकल्यावर
विमान कोसळावं समुद्रात
तसे गळून बुडतात
खोलवर पाण्यात
मग ते पुन्हा फडफडतात
आकाशात उंच उडण्यास
मात्र संपूर्ण आकाश कवेत घेणारे
पंखही हरतात बाजी,
करतात धडपड
सागर लाटा येईपर्यंत
पुन्हा सुखाचे पंख लावून
आकाशात झेप ही घेतलेली असते
सुख पुन्हा शोधताना
पंखासह अवकाशात
कुठे गडप होते
पुन्हा कळतही नाही
ओठांवरील दुःखाना
— रचना : शफीक शेख.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800