“चल उठ रे ! मुकुंदा झाली पहाट झाली
बाहेर चांदण्यांना हलकेच जाग आली”
या भाव गीतावर आधारित सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे सामाजिक प्रबोधनपर भावगीत ..
– संपादक
चल जाग रे माणसा !
झाली संध्याकाळ झाली
बाहेर दिनाच्या वदनावर हलकेच रात्र झाली
चल जाग रे…।। ध्रु।।
मंदावला कधीचा तव जीवनी तेजाचा हा तारा
अन् चोरपावलांनी आला दूष्कर्मांचा हा वारा
वदनावरी दिनाच्या रे! पसरली अंधार सावली
चल जाग रे…।। १।।
घे आवरुन आता दूष्कर्मांचा हा पसारा
बेचैन जगाने केला ईश्वराचा हा पूकारा
तव गीत गात भक्तजन मंदिरी निघाले
चल जाग रे…।। २।।
तूज दूर दूर हाक मारी नद्यांचा हा किनारा
वनातल्या वृक्षांनी केला तुला भावूक ईशारा
तुज शोधण्यास वेडी रानलक्ष्मी पून्हा निघाली
चल जाग रे…।। ३।।
— भावगीतरचना : मधुकर निलेगावकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कविता छान आहे शब्दरचना चांगली
नव्या युगाबरोबर नव्या विचारात सकारात्मकता असावी
या नव्या युगातही मी आनंद कसा शोधतो व आनंदी विचाराने राहतो हे ही महत्वाचे आहे
ज्ञान वाढले जगण्याची क्षितिजे बदलली मूल्ये बदलली त्यामुळे नव्या प्रवाहातही मी आनंद शोधत स्वतः मधे ऊर्जा वाढवत आहे