Friday, December 27, 2024
Homeसाहित्यशब्दात येत नाही

शब्दात येत नाही

येते मनात काही, ओठावर येत नाही
थिजलेले विरघळून शब्दात येत नाही ।।

नजरे समोर दिसते पाहतो खूप काही
मनात पोहचते, काही पोहचत नाही ।।

अविरत कोसळे पाउस कितीदा तरी
मन राही कोरडेच, ते बेटे भिजत नाही ।।

स्वप्न पहाणे असे, जरी विरंगुळा मनाचा
मनी वसलेले, ते येणार स्वप्नात नाही ।।

नदीच्या प्रवाही, मन होई कागद होडी
फसते गूढ भोवऱ्यात पुढे जात नाही ।।

कालचे काल गेले, आजचे काय सांगावे
काय घडेल उद्याला, काही माहित नाही ।।

कसा मी, मलाच नीट समजलेले नाही
कोण असेल कसे अंदाज लागत नाही ।।

— रचना : अरुण वि.देशपांडे, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. खूप छान कविता रचली. अर्थ पूर्ण कविता आहे.
    खूप छान लिखाण केले सर.

  2. माझ्या कवितेला प्रतिसाद देणाऱ्या रसिकांचे आभार💐

  3. जेष्ठ कवी अरूण देशपांडे सर अर्थपूर्ण काव्य

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९