Wednesday, February 5, 2025
Homeलेखजागतिक एड्स दिनानिमित्त…

जागतिक एड्स दिनानिमित्त…

एड्स (AIDS) व HIV च्या विरोधातील जागरुकता वाढवून बाधित व्यक्तींशी एकात्मता दर्शवण्यासाठी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन निर्माण करून एड्समुळे मृत्यू पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ १९८८ पासून ‘जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एड्स (AIDS) दिन म्हणून पाळला जातो.

यासाठी दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात येते. या वर्षीची संकल्पना,
मानवाधिकारांना प्राधान्य देण्यावर आधारीत संदेश – ‘हक्कांचा मार्ग निवडा, माझे आरोग्य माझा हक्क’ ही आहे.
जी एड्सला २०३० साला पर्यंत सार्वजनिक आरोग्याचा धोका म्हणून संपवण्याच्या उद्दीष्टांशी संबंधीत आहे. एड्स बाबत जागरुकता व एकात्मता निर्माण करण्यासाठी लाल रिबन (मराठी उलटे ४ सारखे) हे प्रतीक (symbol) आहे.

एड्सचा उगम – :
AIDS व HIV संसर्ग १९२० च्या दशकात पश्चिम आफ्रिकेत चिंपांझी या माकडवर्गीय प्राण्यापासून झाल्याचे मानले जाते. त्यानंतर अवघ्या सहा दशकांनी (१९८१) अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळून आला. तर भारतात चेन्नई (तामिळनाडू) येथे (१९८६) मध्ये पहिला रुग्ण आढळला.

HIV/AIDS म्हणजे काय ?
HIV (Human Immunodeficiency Virus) हा एक विषाणू आहे, जो मानवाच्या प्रतिकार शक्तीवर परिणाम करतो, तर AIDS (Acquired Immunodeficiency Syndrome) ही या विषाणूमुळे होणाऱ्या गंभीर आजाराची प्रगत अवस्था आहे. HIV संसर्गामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, ज्यामुळे व्यक्तीला विविध संसर्ग व आजार होण्याचा धोका वाढतो. AIDS ला मुख्य कारणीभूत व्हायरस म्हणजे HIV. हा व्हायरस शरीरातील रोग प्रतिकारक पेशींना (CD4) हळूहळू नष्ट करुन शरीराची संरक्षण यंत्रणा कमकुवत करुन पेशींची संख्या अत्यंत कमी होते. तेव्हा एचआयव्ही बाधित व्यक्तीला ‘एड्स’ असे घोषित केले जाते. एड्स बाधित व्यक्तींना क्षयरोग, न्युमोनिया, मेंदूशी संबंधित संसर्ग यांसारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो.

लक्षणे – :
प्रारंभिक अवस्थेत ताप, अंगदुखी, घसा खवखवणे अशी फ्लू सारखी लक्षणे दिसतात. प्रगत अवस्थेत वजन कमी होणे, वारंवार आजारी होणे, त्वचेवर पुरळ येणे आणि थकवा जाणवणे.

असा होतो संसर्ग/लागण – :
संक्रमित रक्ताचा किंवा अशुद्ध इंजेक्शन (सुईं) वापर झाल्यास, संक्रमित व्यक्तीसोबत कंडोमचा वापर न करता असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास, गर्भधारणेदरम्यान व प्रसूतीदरम्यान किंवा स्तनपानाद्वारे आईकडून बाळाला, तसेच संसर्गीत अवयव प्रत्यारोपणाद्वारे या आजाराचा संसर्ग/लागण होते.

हे केल्याने संसर्ग/लागण होत नाही – :
HIV/AIDS बाधीत व्यक्ती सोबत हस्तांदोलन करणे, मिठी मारणे किंवा साध्या स्पर्शाने, एकत्र जेवण किंवा कपडे वापरल्याने, शिंका किंवा खोकल्यामुळे, पाण्याच्या स्रोत किंवा डास चावल्याने संसर्ग/लागण होत नाही.

बचावासाठी काय खबरदारी घ्यावी – :
एड्स सारख्या आजारांपासून बचावासाठी सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे एकाच जोडीदाराशी निष्ठा राखणे किंवा असुरक्षित संबंध टाळणे, सुरक्षित लैंगिक (कंडोमचा वापर) संबंध ठेवणे, संक्रमित रक्त किंवा इंजेक्शन (सुईं) वापर टाळणे. गर्भवती महिलांनी एचआयव्ही चाचणी करून प्रतिबंधक उपाययोजना करणे, एचआयव्ही एड्सबद्दल अधिक समजूत आणि योग्य उपचारांसह या आजारावर नियंत्रण नक्कीच शक्य आहे.

उपचार – :
सध्या HIV साठी कायमस्वरूपी उपचार नाहीत, पण Antiretroviral Therapy (ART) वापरून विषाणूचे परिणाम कमी करता येऊ शकतात. ज्यामुळे HIV चा प्रसार रोखून व्यक्तीचे आयुष्य दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतात. योग्य वेळी निदान आणि उपचारामुळे रुग्ण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो.

तुलनात्मक अभ्यास – :
UNAIDS आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) यांच्या सर्वेक्षणानुसार जगात अंदाजे चार कोटी एड्स बाधित रुग्ण असून जगाच्या तुलनेत भारतात चोवीस लाख (६%) इतकी संख्या आहे. तर भारतातील एकूण राज्य व केंद्राशासीत प्रदेशाच्या तुलनेत महाराष्ट्रात अंदाजे ३ लाख ९६ हजार (१६.५%) इतकी रुग्ण संख्या असून हे भारतातील सर्वाधिक प्रभावित राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे येथे सर्वाधिक रुग्ण संख्या असून नंदुरबार, गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये तुलनेत कमी आहे.

जागतिक, राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न – :
एड्स बाबत जागतिक, राष्ट्रीय व राज्य पातळीवर शासनाकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका, सरकारी धोरणे आणि नागरिकांच्या सहभागाची महत्त्वाची भूमिका आहे. अलीकडील संशोधनानुसार HIV च्या उपचारासाठी नवीन औषधं विकसित होत आहेत. जागतिक पातळीवर संसर्गाच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे, पण तरीही चाचणी, उपचार आणि प्रतिबंधावर भर देणे आवश्यक आहे.

जागरूकतेची गरज – :
HIV/AIDS बद्दलचे गैरसमज दूर करणे आणि जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असून बाधित व्यक्तींना सामाजिक आणि भावनिक आधार देणे गरजेचे आहे. बाधित लोकांशी भेदभाव करणे टाळावे, त्यांना रोजगार आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन त्यांच्या हक्कांसाठी काम करणे आपली सामाजिक जबाबदारी आहे.

आवाहन – :
चला तर HIV व AIDS ला हरवण्यासाठी ज्ञानाची आणि जागरूकतेची ताकद वापरून आणि गैरसमज दूर करुन जनजागृती वाढवूया आणि एक सुदृढ समाज घडवण्याची प्रतिज्ञा करुया.

— संकलन : विलास गोहणे. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी