Wednesday, February 5, 2025
Homeबातम्यामंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघ : प्रवेशिका पाठवा

मंत्रालय, विधिमंडळ वार्ताहर संघ : प्रवेशिका पाठवा

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२३-२०२४ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारकरिता आपली नामांकने व शिफारशी येत्या २५ डिसेंबर २०२४ पूर्वी पाठवाव्यात, असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने केले आहे.

हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :

१) जीवनगौरव पुरस्कार – (राज्यस्तरीय)- एक,
२) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (राज्यस्तरीय) – वृत्तपत्र प्रतिनिधी- एक, वृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधी पुरस्कार -एक, आणि
३) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांकारिता) एक, अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे.

पुरस्कारांचा तपशील :-

१) कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार:जेष्ठ पत्रकारांचे पत्रकारितेतील योगदान किमान २५ वर्षे असावे.
त्यांचे वय ६० वर्षे पूर्ण असावे. पत्रकाराने राज्यस्तरावर पत्रकारिता क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड केली जाईल.

या पुरस्कारासाठी राज्यातील पत्रकार, पत्रकार संघटना व अन्य मान्यवर व्यक्ती यांच्या शिफारशीही विचारात घेण्यात येतील.

पूर्वीचे मानकरी :-

यापूर्वी हा पत्रकार सर्वश्री वसंत देशपांडे, विनायक बेटावदकर, कै. विजय वैद्य, कै. दिनू रणदिवे, दिनकर रायकर, कुमार कैतकर, अजय वैद्य यांना प्रदान करण्यात आला आहे.

२) राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २.
सदर पुरस्कार वृत्तपत्र प्रतिनिधी व वृत्तवाहिनी प्रतिनिधी यांना प्रत्येकी एक याप्रमाणे देण्यात येतो.

या पुरस्कारासाठी पत्रकारितेत पूर्णवेळ सेवा बंधनकारक असून भाषेचे बंधन नाही. वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधीना मागील दोन वर्षाच्या बातम्या /लेख यांची कात्रणं, तर वृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधीना चित्रफित /ध्वनीफित ( सी. डी. अथवा पेनड्राईव्ह) देणे बंधनकारक राहील. यावर अर्जदारांचे नाव तसेच संपादक किंवा संस्थेचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रवेशिका सांक्षाकित केलेली असावी.

३) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. १

या पुरस्कारासाठी केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांनाच सहभागी होता येईल. अर्जदाराने दि. १ जानेवारी २०२३ पासून ते अर्ज करण्याच्या दिनांकपर्यत कात्रणे/ध्वनीफित / चित्रफीतसह प्रवेशिका द्याव्यात.

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या नामांकनाच्या प्रवेशिका अन्यथा मान्यवरांच्या शिफारशी तपशीलवार माहितीसह पुढील पत्त्यावर येत्या २५ डिसेंबर २०२४ पर्यत पाठवाव्यात.सर्व पुरस्कारांसाठी निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता:

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, तळमजला, पत्रकार कक्ष, मंत्रालय,
मुंबई -४०००३२ किंवा mahamantralaya@gmail.com

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी