साहित्य उपक्रमात सतत कार्यरत असलेले, सदा सर्वकाळ हसतमुख, अत्यंत चैतन्यदायी व्यक्तीमत्व लाभलेले आमचे मित्र रसिकराज विलास देवळेकर हे त्यांच्या आयकर विभागाच्या नोकरीतून नियत वयोमानानुसार नुकतेच मुक्त झाले.
चर्चगेट येथील आयकर भवन मध्ये, आयकर विभाग स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक व कवी श्री विलास देवळेकर यांचा काल “निरोप समारंभ” आयोजित करण्यात आला होत. त्यांच्या निरोप समारंभाबरोबर उपाध्यक्ष श्री पेडामकर व प्रशासकीय अधिकारी श्री फगरे यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.
आयकर विभाग स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्यालय कौटिल्य भवनचे कार्यालय प्रमुख या नात्याने देवळेकर यांच्या “सेवा निवृत्ती” चे औचित्य साधून, त्यांना मान्यवरांच्या हस्ते आपुलकीचा फेटा, माणुसकीची शाल व सहकार्याचे स्मृतिचिन्ह
देऊन, मान्यवरांच्या हस्ते ‘सत्कार’ करण्यात आला.
धडाडीचे कार्यकर्ते श्री गायकवाड यांनी “वाढदिवस गीत” सादर केले. श्री शेलार यांनी तर, देवळेकर व पेडामकर यांच्यावर बसल्या जागी ‘चारोळी’ सादर केली,
श्री जाधव यांनीही भाषण केले. तसेच, खजिनदार श्री घाणेकर, सरचिटणीस श्री परब, कार्याध्यक्ष श्री मोरे यांनीही आपल्या भाषणात देवळेकर यांच्या कार्याचा गौरव करताना, “सेवा निवृत्ती नंतरच्या काळात आपण सामाजिक कार्य आणि साहित्य सेवा तसेच कवितेचा छंद जोपासत असताना, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवर्जून सांगितले.
सत्काराला उत्तर देताना, देवळेकर यांनी आपल्या स्टाईलमध्ये, ‘म्युझिकल इक्को साऊंड सिस्टीम’ भाषणात, लोकाधिकार समितीचे आभार मानून समितीचे पुढेही सहकार्य लाभत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
ह्या सत्कार समारंभाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन वाघे यांनी केले. अशाप्रकारे ‘भावपूर्ण’ पण, खेळीमेळीच्या वातावरणात श्री देवळेकर यांना ‘निरोप’ देण्यात आला.
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे ही श्री देवळेकर यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800