गुरुवार दिनांक २४ जून २०२१ रोजी सकाळी ११.११ मिनिटांनी यू ट्यूब चॅनलवर अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या जीवनावरील “हम गया नहीं…. जिंदा है” या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे.
श्री अभिषेक निकम यांनी कथा – पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे, तर कॅमेरामन आहेत श्री. रोहित जयवंत, सहायक दिग्दर्शक श्रीराम शिंदे आणि धनश्री भालेकर, एडिटर मितेश पांचाळ आणि मोईन्नुद्दिन रियाझ खान, प्रोडक्शन मॅनेजर आणि मेक अप हेमंत जाधव.
संगीत अथर्व निगडी – देव अहिराव. मेंटोर नम्रता भट.
कलाकार उषा नाडकर्णी, योगेश सोमण, शुभांगी लाटकर, अनिल कामत, विघ्नेश जोशी, पालवी कदम, मिलिंद जोशी, धनश्री दामले, धनश्री भालेकर, जनार्दन कदम, नेहा परांजपे आणि प्रमुख भूमिकेत आहेत ऋषीकेश प्रधान.
सर्व स्वामींभक्तांना आवाहन करण्यात येते की… . आपण यू ट्यूब चॅनलवर हा चित्रपट नक्की बघा.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Om Shree Swami Samarthay Namah