आई तु स्त्री च्या रुपातली
पूजतेस शारदा आणि लक्ष्मी.
पूजतेस दुर्गा आणि पार्वती.
मग का नाकारतेस या गर्भतली ही देवी
आई तु लढ लढाई माझ्या अस्तित्वाची
आदर्श ईथे अहील्यादेवी
अन् फुलेची सावित्री.
लढल्या ईथे राणी झाशीची
अन् वीर ताराराणी
अशी ही स्त्री जन्माची पावन भूमी
मग का माझ्या जन्मावर पुरूषाची मनमानी
आई तु लढ लढाई माझ्या अस्तित्वाची
राम जन्मला कौशल्ये पोटी
जन्मले शिवबा जिजेच्या उदरी
अनेक महात्मे जन्मले
या भूमीवर स्त्रियांच्या पोटी
मग का नाकारतेस अस्तित्व
माझे या पावन जगी
आई तु लढ लढाई माझ्या अस्तित्वाची
आई हलकी हलकी चाहूल माझी ऐक ना
जाणीवेच्या स्पर्शातून शब्द माझे ऐक ना
मी पाहिले स्वप्न जगण्याचे
आई, माझ्या अस्तित्वासाठी
तू एकदा लढ ना
आई तु लढ लढाई माझ्या अस्तित्वाची
— रचना : सौ.शितल अजय अहेर. खोपोली, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800