अजून मनात ऊर्जा आहे,
हृदय सशक्त आहे अजून
शरीर आहे निरोगी छान,
आयुष्य अर्धे झाले जगून,
आता बराच अनुभव आहे,
बायकोची मैत्रीण व्हायची
खाणे, फिरणे, आवड जपणे,
हृदयात धडधड वाढवायची,
प्राणायाम, आसने याची सकाळ,
सकाळचे फिरणे, हा सहवास,
मस्त आवडीचे हॉटेलचे नास्टे,
भरपूर गप्पा, चर्चा, सहप्रवास,
थोडा आहोत पैसा हा राखून,
वेळ ही भरपूर सोबत जपून,
किती आठवणी तुझ्या नी माझ्या,
आयुष्य सुंदर, हे स्वप्न म्हणून…!!!
— रचना : हेमंत भिडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800